Disha Shakti

सामाजिक

श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय, हत्तुरे नगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love

सोलापूर प्रतिनिधी / नागनाथ पाटील : श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय, हत्तुरे नगर, सोलापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.वैजिनाथ हत्तुरे, उत्तर सोलापूरचे शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार साहेब,धरेप्पा हत्तुरे,पर्यवेक्षक रमेश दिंडोरे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी आर्ट ऑफ लिव्हींग योग शिक्षक संस्थेचे योग गुरु सुहास म्हंता, नरेश अण्णम यांनी योगासनाचे प्रकार, सूर्यनमस्कार व मेडिटेशन याबद्दल माहिती सांगितली व त्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. या योगदिनी एकूण 985 विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी प्राचार्य वैजिनाथ हत्तुरे यांनी विद्यार्थ्यांना योगासन करताना कोणती काळजी घ्यावी, शारीरिक हालचाली कशा कराव्यात, तन आणि मन यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे योग होय , नियमितपणे योगा करुन निरोगी राहण्याचा मूलमंत्र दिला व योगी बना, पवित्र बना व जीवन सार्थक बनवा हा संदेश दिला. तसेच योगासनाचे फायदे, महत्त्व व गरज याविषयी मार्गदर्शन केले तसेच प्रकाश प्रवहन कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके व परमेश्वर चांदोडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास अण्णाराया तुप्पद, सविता कुलकर्णी, अनिता हौदे, भारत राऊत,गणेश कोरे, लक्ष्मीकांत पनशेट्टी, अनिलकुमार गावडे, अमरनाथ कदारे, संतोष स्वामी, आनंद काकडे , विद्याधर हुलगेरी, प्रकाश चिवडशेट्टी, बाबुराव कलशेट्टी, संतोष हिरेमठ, प्रतिक्षा बिडवे , प्रिया पसारे , सुकेशनी गंगौडा तसेच प्रशालेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती माने यांनी केले, तर आभार रमेश आगवणे यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!