पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये ज्यांना ओळखले जाते असे पळशी गावचे खा.निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष लोकनेते गणेश आप्पा हाके यांचा आज वाढदिवस कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व समस्यांसाठी नेहमीच काम करत असलेले प्रस्थापितांच्या विरोधात आवाज बुलंद करत राजकारण समाजकारण करण्याची प्रेरणा असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच गणेश हाके होय.
पळशी हे पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक गाव प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते अशा या गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रकाश राठोड यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे गणेश हाके. गावच्या विकासासाठी आणि गावाला राजकीय पातळीवर ओळख निर्माण करून देण्यासाठी गणेश हाके हे काम करत आहेत. पळशी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मेंढपाळ व आदिवासी समाज राहतो धनगर समाजाचे प्रश्न खऱ्या अर्थाने ज्यांनी जाणून घेतले आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे हाके हे खऱ्या अर्थाने दिन दुबळ्यांचे नेते म्हणून सध्या पारनेर तालुक्यात ओळखले जाऊ लागले आहेत.
खा. निलेश लंके यांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांना पारनेर तालुक्यात ओळखले जाते असे गणेश हाके हे खा. लंके यांच्या नेतृत्वाखाली पळशी गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. सर्व पक्षांमध्ये ज्यांचा मित्रपरिवार आहे असे गणेश हाके हे खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य आदर्श व्यक्तिमत्व म्हणून समाजात काम करत आहे.
राजकीय सामाजिक जीवनात अनेक चढ-उतार पार करत धनगर समाज्याच्या साठी प्रस्थापितांच्या विरोधात आवाज बुलंद करत 2020 साली पारनेर तालुक्याच्या.खा.निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष गणेश आप्पा हाके यांची नियुक्ती झाली.या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्त्वाला जनतेने डोक्यावर घेऊन लोकनेते पदावर बसविले. पळशी या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठल रुक्मिणीचे आदर्श असे मंदिर आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा येथे जपला जातो या देवस्थानला राज्यात अ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यासाठी गणेश हाके हे खा. निलेश लंके यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.
पळशी भागात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतो राजूर प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी मोठमोठे प्रकल्प व योजना राबवल्या जातात या योजना सर्वसामान्य आदिवासी बांधवांना मिळविण्यासाठी गणेश हाके हे खा. लंकेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील असतात या भागातील धनगर समाजासाठी काम करत असताना अनेक योजनांचा फायदा त्यांनी करून दिला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गणेश हाके धनगरी वादळ म्हणून आता पारनेर तालुक्यात ओळखले जाऊ लागले आहे. मेंढपाळांचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिले जात आहे.
पळशी गावातील स्थानिक रस्ते जोडण्यासाठी शेत पानंद च्या माध्यमातून पाच कोटीचा भरीव निधी सरपंच राठोड व गणेश हाके यांनी गावांमध्ये आणला आहे तसेच शाळा खोल्यांसाठी निधी रस्त्यांसाठी निधी व जलजीवन योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी त्यांनी १ कोटी ९२ लाखाचा निधी त्यांनी आणला आहे. हाय मॅक्स अधिव्य बसवून पळशी गावाला त्यांनी लखलखाटीत केले आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन गणेश हाके यांनी प्रकाश राठोड यांना खऱ्या अर्थाने राजकारणात समाजकारणात साथ दिली उंची ही अनेक आजच्या युवकांना प्रेरणा देणारी आहे. खा.निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटनेच्या माध्यमातून खा. निलेश लंके यांच्या पाठीमागे त्यांनी मोठी ताकद उभी केली आहे.
Leave a reply