इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : दि.२१ जून जागतिक योग दिन माणसाच्या जीवनामध्ये योग साधनेची गरज मोठी आहे कारण आज माणसाची जीवन शैली बदलत आहे यासाठी योगा नियमित करणे खूप महत्त्वाचे आहे याची जनजागृती होण्यासाठी योग दिनाचे औचित्य साधून ब्राईट लाईफ सामाजिक संस्था व महा एन जी ओ फेडरेशन व भाजप सेवा प्रकोष्ठ पळसदेव यांच्या वतीने पळसदेव एस.बी.स्पोट अकादमी पळसदेव ता.इंदापुर जि.पुणे येथे जागतिक योग दिना निमित्त मा. शेखरभाऊ मुंदडा, संस्थापक महा एन जी ओ फेडरेशन तथा प्रदेश संयोजक सामाजिक संस्था भाजप यांचे संकल्पनेतून योग यज्ञ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी योग शिक्षक सागर बनसुडे व विलास शेलार यांनी मार्गदर्शन केले आहे. यावेळी एस.बी.स्पोट करिअर अकॅडमीचे सागर बनसुडे सर, मॅडम व सहकारी शिक्षक सर, ब्राईट लाईफ सामाजिक संस्थेचे सिद्धनाथ माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
ब्राईट लाईफ सामाजिक संस्थाचे विद्यमाने एस.बी.स्पोट अकादमी पळसदेव येथे जागतिक योग दिन साजरा

0Share
Leave a reply