नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नायगाव तालुक्यातील मौजे कांडाळा येथील गेले अनेक वर्षापासून असलेली प्रलंबित मागणी यांना वाचा फोडत नायगाव विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार मा.राजेश पवार साहेबआमदार निधीतून मा. पुनम ताई जी पवार यांच्या शुभ हस्ते एकूण दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन कांडाळा येथे करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षा पुर्वी जनतेनी आमदार म्हणून राजेश पवार यांना निवडून दिले.त्यामुळे मागील अनेक वर्षात जेवढे विकास कामे झाले. त्यांच्या किती तरी पटीने या पाच वर्षांत आ.पवार यांनी विकास कामे केले त्यामुळे मतदार संघाचा कायापालट झालेला दिसुन येत आहे. या पुढेही आ.पवार यांच्या मार्गदर्शनातून मतदार संघात विकासाची गंगा सुरूच राहणार असल्याचे मत भाजपा महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष्या माजी जि.प.सदस्या पुनमताई पवार यांनी कांडाळा येथे दोन कोटी रूपयाच्या नाली बांधकाम सुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
कांडाळा ते धानोरा कांडाळा गावातील अंतर्गत जाणा-या रस्त्याच्या दोन्ही बाजुने मोठ्या नालीची गरज होती त्यासाठी आ.राजेश पवार यांनी २ कोटी रूपये मंजुर करून घेतले .त्या नालीकामाचे सोमवारी माजी. जि.प.सदस्या पुनमताई पवार यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता पा.ढगे , बाबासाहेब हबर्डे , धनजय पा.जाधव , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बी.डी.बारसकर, कनिष्ठ अंभियंता सुयोग धाबे , गावातील जेष्ठ नागरिक परसराम पा जाधव, ग्रामसेवक पि. जि. वाघमारे, लक्ष्मण पा जाधव, श्रीहरी पा कदम, गजानन पा. जाधव , पोलीस पाटील मारोती इरेवाड, काशीनाथ पा कदम, दलाधन पा जाधव,शिवाजी पा जाधव,माजी सरपंच मारतो कांबळे, गोविंद पा कदम, उत्तम इरेवाड, नागोराव गंडरेवाड, शामसुंदर पा कदम,भाजपा शोसल मिडीया सहसंयोजक नायगाव तालुका गजानन शामसुंदर पा कदम,भाजपा युवा तालुका उपाध्यक्ष परमेश्वर पा जाधव, नरहरी पा कदम व गावातील आदी जण उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षा पुर्वी नायगाव मतदार संघातील मतदारांनी आ.राजेश पवार यांना विधानसभेत पाठविले. निवडणूकीत जनतेला विकास कामाचे दिलेले आश्वासन आ.पवार यांनी पुर्ण केले असल्याचे दिसुन येत आहे.पाच वर्षांत मतदार संघात रस्ते , पुल , नाल्या आदी विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सर्वत्र विकास कामे दिसुन येत आहे. त्यामुळे मतदार संघात विकास करणारे आमदार म्हणून राजेश पवार यांचे नाव मतदार घेत आहेत.कांडाळा येथील नाली बांधकामाचे भूमिपूजन झाल्यावर मुगाव येथील गावात २ कोटीच्या सी.सी.रोड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले तर माहेगाव येथील १ कोटी ४० लाख च्या निधीतून सी.सी.रोड व नाली बांधकामाचे लोकार्पण सोहळा पुनमताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. माहेगाव व मुगाव येथेही गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कांडाळा येथील २ कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ मा.पुनमताई पवार यांच्या शुभहस्ते संपन्न

0Share
Leave a reply