राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : आज दिनांक 25जून रोजी स्व. विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शाळेचा वर्धापन दिन अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला तसेच नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा व दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी ह.भ.प. किशोर महाराज गडाख ( शास्त्री) श्री संत सेवाधाम वांबोरी तसेच अनेक मान्यवर व नवीन विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे ढोल ताशा व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळेस प्रमुख पाहुण्यांचा शाळेच्या प्रा. सौ.अश्विनी बानकर यांनी सत्कार केला तसेच सर्वांना शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यानंतर नवीन विद्यार्थ्यांचे फिंगरप्रिंट घेऊन अक्षर पूजन व विद्यारंभ करण्यात आले. सर्व नवीन विद्यार्थी व पालकांचे विद्यार्थ्यांनी बनवलेले सेल्फी पॉईंट मध्ये क्राऊन घालून फोटो घेण्यात आला.दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांसमवेत आदर सत्कार करण्यात आला. या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य,भाषणे असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना छोटेसे गिफ्ट देण्यात आले व कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Leave a reply