दिशाशक्ती राहुरी / जावेद शेख : टिळकनगर येथील अमित डहाणूकर इंडस्ट्री मुळे होत असलेल्या जमीन आणि वायू प्रदूषण प्रश्नी डॉ विजय मकासरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व निवेदन दिले.यावेळी हा विषय पर्यावरणाशी निगडित असून हे खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून डहाणूकर इंडस्ट्रीज वर त्वरित कारवाई करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. विजय मकासरे यांना दिले. श्रीरामपूर तालुक्यातील टिळक नगर येथे अमित डहाणूकर यांच्या टिळक नगर इंडस्ट्रीज मध्ये सुरू असलेल्या प्रदूषणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी या नापीक झाल्या असून तेथील वायू प्रदूषणामुळे अनेक आबालवृद्धांना श्वसनाचा त्रास सुरू झालेला आहे.
यामुळे कित्येकांचा बळीही गेलेला आहे.महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.तेथील जमिनीत बोर किंवा विहीर घेतल्यानंतर लाल रंगाचे दूषित पाणी येते तसेच जमिनीत पिके ही येत नाहीत.यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झालेले आहे अशा आशयाचे निवेदन डॉ.विजय मकासरे यांनी माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून दिले आहे या निवेदनाचा पाठपुरावा करून तसेच पर्यावरण खाते हे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून संबंधित डहाणूकर इंडस्ट्रीजवर त्वरित कारवाई करू तसेच महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड यांनी जाणीवपूर्वक या कंपनी कडे दुर्लक्ष केले आहे का याची माहिती घेऊन संबंधित कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू तसेच नव्याने प्रदूषणा बाबतीत तपासणी करण्यास सांगू असे आश्वासन माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी डॉ. मकासरे यांना दिले आहे.
या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की ज्या स्थानिकांच्या जमिनींना पीक झाले आहे व ज्यांना या प्रदूषणाचा त्रास होत आहे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला कायमस्वरूपी नोकरी द्यावी तसेच त्यांना नापीक झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अन्यथा 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट 2024 रोजी मंत्रालय येथे आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे..
डहाणूकर प्रदूषण प्रश्नी मंत्रालयात आंदोलन करणार करणार- डॉ.विजय मकासरे. मकासरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट ..

0Share
Leave a reply