राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : आरोपी क.१ नामे विद्वबाई मारूती शिनगारे, रा. डिग्रस, ता.राहुरी, जि. अहमदनगर, आरोपी क.२ नामे सिमा रावसाहेब बोरुडे, रा. डिग्रस, ता. राहुरी, जि.अहमदनगर, आरोपी क.३ नामे छकुल्या रावसाहेब बोरुडे, रा. डिग्रस, ता.राहुरी, जि. अहमदनगर, आरोपी क. ४ नामे शिवाणी रोहित लांडगे, रा. डिग्रस, ता.राहुरी, जि. अहमदनगर, आरोपी क.५ नामे मोईन अमिर शेख, रा. डिग्रस, ता. राहुरी, जि.अहमदनगर व आरोपी क.६ नामे शरद राजाराम शिदि, रा. डिग्रस, ता. राहुरी, जि.अहमदनगर यांनी मयत रोहीत कचरू लांडगे, रा. वरवंडी, ता. राहुरी यास वारंवार लाथाबुक्क्यानी मारहाण व शिवीगाळ केली व त्याच्या त्रासाला कंटाळून मयत रोहीत कचरू लांडगे याने त्याच्या राहत्या घराच्या पत्र्याच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब श्री. एन. आर. नाईकवाडे साहेब यांनी आरोपींना दोषी धरून भा.द.वि.का.कलम ३०६ सह ३४ प्रमाणे ५ वर्षाची सक्त मजुरी व रक्कम रूपये २०००/- व दंड न भरल्यास १ महिना साध्या कैदेची शिक्षा, भा.द.वि.का. कलम ३२३ सह ३४ प्रमाणे ६ महिने सक्त मजुरी व रक्कम रूपये १०००/- व दंड न भरल्यास १५ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.
सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, फिर्यादी शिवयाई कचरू लांडगे, रा. वरवंडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर हिचा मुलगा रोहित कचरू लांडगे याचे लग्न आरोपी शिवाणी रोहित लांडगे याचेबरोबर झाले होते. दिनांक १५/०४/२०२१ रोजी मयत रोहित कचरू लांडगे याचे सासरकडील आरोपी बिट्टूबाई मारूती शिनगारे, सिमा बोरूडे, छकुल्या बोरुडे, व इतर दोन इसम यांनी मयताची पत्नी शिवाणी हिस माहेरी घेवून जाण्याच्या कारणावरून व शिवाणी हिस माहेरी घेवून जाण्यासाठी आरोपी नं.३ छकुल्या उर्फ सतिष रावसाहेब बोरूडे हाच का येतो असे मयत रोहित याने विचारल्याच्या कारणावरून त्यास वारंवार शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. मयत रोहित याने आरोपींच्या वारंवार होणा-या त्रासाला कंटाळून दिनांक १६/०४/२०२१ रोजी सकाळी ०७.३० वाजता राहत्या घरी वरवंडी, ता. राहुरी येथे राहत्या घराच्या पत्र्याच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. म्हणून मयत रोहित याचे आई शिवूबाई कचरू लांडगे हिने आरोपीविरूध्द राहुरी पोलिस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल फिर्याद दिलेली होती. सदर फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी आरोपीविरूध्द भा.द.वि.का. कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा नोंदविला होता. राहुरी पोलिसांनी आरोपीविरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सदर प्रकरणात आरोपीचा गुन्हा शाबीत करण्याकामी अभियोग पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी, तपासी अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एन.आर. नाईकवाडे साहेब यांनी अभियोग पक्षाने सादर केलेला एकंदरीत पुरावा तसेच परिस्थिती जन्य पुरावा ग्राहय धरून आरोपी क.१ नामे विटूबाई मारूती शिनगारे, रा. डिग्रस, ता. राहुरी, जि. अहमदनगर, आरोपी क.२ नामे सिमा रावसाहेब बोरूडे, रा. डिग्रस, ता. राहुरी, जि. अहमदनगर, आरोपी क.३ नामे छकुल्या रावसाहेब बोरुडे, रा. डिग्रस, ता. राहुरी, जि.अहमदनगर, आरोपी क.४ नामे शिवाणी रोहित लांडगे, रा. डिग्रस, ता. राहुरी, जि. अहमदनगर, आरोपी क.५ नामे मोईन अमिर शेख, रा. डिग्रस, ता. राहुरी, जि.अहमदनगर व आरोपी क.६ नामे शरद राजाराम शिंदे, रा. डिग्रस, ता. राहुरी, जि.अहमदनगर यांस दोषी धरून भा.दं. वि. का. कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ प्रमाणे वरील कलमांन्वये शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता श्री. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पो.हे.कॉ./१९४३ ए.बी. चव्हाण, पो.हे.कॉ./२५८२ राजु वाघ, पो.कॉ. भगवान धोरात व पो.कॉ. महेश शेळके यांनी सहकार्य केले.
“सासरच्या छळाला कंटाळून जावयाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुरीतील आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा”

0Share
Leave a reply