दिशाशक्ती मुंबई : बुधवार दिनांक २६ जून २०२४ रोजी संभाजी नगर, डॉ.मौलाना अबुल कलाम सभागृह छत्रपती संभाजी नगर येथे मान्यवरांच्या हस्ते गीतकार भारत कवितके मुंबई यांना कला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तेजस फाऊंडेशन नाशिक या संस्थेने महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता,गीत, संगीत, क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.फाऊंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, मेघा डोळस यांनी आपला मुलगा तेजस यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी मेघा डोळस यांना मुलगा तेजस च्या आठवणी ने अश्रू अनावर झाले.गीतकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांना गीतकार क्षेत्रातील कला रत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
भारत कवितके यांच्या युट्यूबवरील चार गाण्यांनी सध्या सर्वत्र धमाल उडवून दिली आहे.” राणी सांजवेळी” ” बापू बिरु वाटेगावकर अमर झाला.” ” लोकमाता अहिल्याबाई होळकर”,” जात आमची भारी हाय धनगर” अशी गाणी भारत कवितके यांनी लिहीली.तर येत्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने ” आज विठू तुझ्या पंढरीत मी आलो, वारकऱ्यां सोबत मी वारकरी झालो.” हे भक्ती गीत लवकरच येत आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यात नितीन देशमुख, अभिनेत्री मानसी राणे, आशिष सातपुते,तुपे सर, गायिका कडूबाई खरात,मान्यवर उपस्थित होते.तर सूत्र संचालन पंकज शिंदे यांनी केले,व प्रस्ताविक तुपे सर यांनी केले.आशिष सातपुते यांनी अनेक मराठी हिंदी अभिनेत्यांचे आवाज काढून मनोरंजन केले,कडूबाई खरात यांनी दोन गाणी गायली.
Leave a reply