दिशाशक्ती नेटवर्क / जावेद शेख : प्रवासी संघटनेचे तालुकास्तरावरील कार्य हे राज्याला दिशा देणारे आहे असे प्रतिपादन उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकारी श्री.आनंता जोशी यांनी केले.येथील उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार संभाळल्याबद्दल प्रवासी संघटना आणी ग्राहक पंचायत यांच्यावतीने त्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद बऱ्याच वर्षांपासून रिक्त होते, यासंदर्भात प्रवासी संघटनेच्यावतीने राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता.
सदरील रिक्त पद भरण्यात विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती, श्री.आनंता जोशी यांनी नुकतीच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची सुत्रे हाती घेतली असल्याने प्रवासी महासंघ महाराष्ट्र प्रदेश,व ग्राहक पंचायत महाराष्ट्र प्रदेश शाखा श्रीरामपूर यांचे संयुक्त विद्यमाने त्यांचा स्वगतपर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड, डॉ.गोरख बारहाते, विजयराव नगरकर, दत्तात्रय काशिद, बाळासाहेब निकम यांनी त्यांचा स्वागतपर सत्कार करुन सविस्तर चर्चा केली.
पुढे बोलताना श्री.जोशी म्हणाले की,एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी प्रवासी संघटनेचे एव्हडे रचनात्मक कार्य असल्याची पाहुन जीतके कौतुक करावे तीतके कमीच आहे, तसेच प्रवासी संघटनेस आरटीओ खाते नेहमी सहकार्य करेल, आपले प्रश्न सोडविण्यात येतील,असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. ग्राहकांनी देखील काही सुचना असल्यास कळवाव्यात त्यावर आरटीओ खाते लक्ष देईल शेवटी असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मयूर मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक प्रताप शिंदे, समता ऑनलाईन सर्व्हिसेसचे सरताज शेख, प्रतिनिधी सुशिल गांधी आदि.मान्यवर उपस्थित होते.
श्रीरामपूर प्रवासी संघटनेच्यावतीने आरटीओ अनंता जोशी यांचा सत्कार प्रवासी संघटनेचे तालुकास्तरावरील कार्य राज्याला दिशा देणारे – आरटीओ जोशी

0Share
Leave a reply