राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी श्री.भारत तारडे व राहुरी तालुका युवक अध्यक्षपदी वावरथ येथील श्री.ज्ञानेश्वर बाचकर यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडपत्रात आपली राहुरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुरोगामी विचार व पक्षाचे ध्येय धोरणे समाजात रुजवून पक्ष संघटना मजबूत करावी. राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री. जयंतरावजी पाटील साहेब, पक्षाचे कार्याध्यक्ष मा. खा. सौ. सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री मा.आ.प्राजक्तदादा तनपुरे व युवक प्रदेशाध्यक्ष मा.श्री. महेबूब शेख यांचे मार्गदर्शनानुसार सर्व सामान्य जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे. आपण राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनुभवी आहात, आपल्या कौशल्याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी निश्चितच होईल, असा विश्वास आहे. दोघांचेही अभिनंदन. पक्षाने त्यांना दिलेली जबाबदारी ते सक्षमपणे निभावतील हा विश्वास आहे.असे निवडपत्र यावेळी देण्यात आले.
यावेळी युवकचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे देखील उपस्थित होते. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर, दतात्रय बाचकर, रुशिकेश टेंगळे, उमेश बाचकर, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हे उपस्थीत होते तसेच माजी खा, प्रसाद तनपुरे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा बँकेचे संचालक अरुण तनपुरे, डॉ उषाताई तनपुरे यांच्या सह विविध क्षेत्रातून त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राहुरी तालुका युवक अध्यक्षपदी ज्ञानेश्वर बाचकर

0Share
Leave a reply