Disha Shakti

राजकीय

पारनेर तालुक्यातील जनतेच्या पाठबळावर विधानसभा निवडणूक लढविणारच – सुजित झावरे पाटील

Spread the love

अहमदनगर  विशेष / वसंत रांधवण : पारनेर विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असल्याने नगर जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यामध्ये प्रामुख्याने नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये बाजूला सारून सामाजिक हितासाठी सतत कार्यरत असणारे पारनेर तालुक्यात नदी जोड प्रकल्प राबविणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व कुकडी डावा कालवा सल्लागार समिती सदस्य जलदूत सुजित झावरे यांचे दातृत्व तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी कायम आहे. आगामी पारनेर विधानसभा निवडणुकीत जनतेच्या मनातील आमदार अशी त्यांच्या नावाची चर्चा या तालुक्यातील गावांमधून जोरदार होताना दिसत आहे.

सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक,कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सदैव उल्लेखनीय कार्य करणारे, दानशूर व्यक्तीमत्व अशी ओळख असणारे सुजित झावरे पाटील यांनी आगामी पारनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून मागील काही दिवसांपासून त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीयांनी पारनेर तालुका पिंजून काढत सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला आहे. पारनेर तालुका २०२९ पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. परंतु चालू राजकीय घडामोडी मध्ये २०२४ विधानसभा निवडणुकीत ही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे येणार असल्याची चर्चा होत आहे.
पारनेर तालुका विधानसभा गत पंचवार्षिक ला ही जागा शरद पवार यांनी निलेश लंके यांना उमेदवारी दिली होती. आणि ते निवडून आले होते. परंतु या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी लंके यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे तालुक्याचा ग्रामीण भागातील विकास मात्र म्हणावा तसा नाही झाला. अशी सर्वसामान्य नागरिकांमधून चर्चा आहे. खासदार निलेश लंके यांच्या आगोदर या मतदारसंघात माजी आमदार विजयराव औटी हे शिवसेनेतून निवडून आले होते. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष असताना मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून विकास कामे मार्गी लावली होती. त्यानंतर ह्या मतदारसंघ कायम विकासात्मक दृष्ट्या बाजूला राहिला आहे.
सध्या केंद्रात भाजपाचे सरकार आहे. तर महाराष्ट्रातही मोठ्या राजकीय घडामोडी होत महायुतीचे सरकार आहे.
यामुळे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच विखे पाटील परिवाराचे कट्टर व सामाजिक चळवळीचा नेता म्हणून परिचित असणारे सुजित झावरे पाटील यांनी सध्या पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सामाजिक कार्याला वाहून घेत अनेक वर्षांपासून वैयक्तिक मदत करण्यावर भर दिला आहे.
सुजित झावरे पाटील यांच्याकडे कोणतीही सत्ता नसतानाही या भागात देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून मागेल त्याला सभामंडप, मागेल त्याला रस्ता, आरोग्य विषयी प्रश्न ते तातडीने सोडवत आहेत. समाजकार्य करीत ग्रामीण भागात विकासाभिमुख कामे करण्याचे व्हीजन सुजित झावरे यांनी सध्या ठेवले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील जनतेच्या मनातील आमदार या चर्चेला सध्या जोर आला आहे. सामाजिक चळवळीचा जनसेवक आणि जनतेचा नेता म्हणून सुजित झावरे यांनी गावागावात जाऊन सर्वसामान्यांच्या समस्या सोडवित आहेत.

यामुळे सामाजिक कामासह अडचणीतील सामान्य कुटुंबीयांना देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक वैद्यकीय आर्थिक मदत करण्यासाठी सुजित झावरे हे सातत्याने प्रयत्नशील असल्याने या भागात दातृत्व करणारा नेता म्हणून त्यांची क्रेझ वाढली आहे. दर शनिवार आणि रविवार झावरे यांच्या पारनेर व टाकळीढोकेश्वर येथिल देवकृपा फाउंडेशनच्या ऑफिसला तसेच वासुंदे येथिल निवासस्थानी पारनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा राबता वाढला असून कोणत्या न कोणत्या कारणाने सहकार्याची अपेक्षा ठेवून या ठिकाणी मोठी गर्दी होतानाचे चित्र दिसत आहे. हि जनता सुजित झावरे पाटील यांच्या पाठीशी खंबीर असल्याने त्यांच्या पाठबळावर आपण विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी दिशा शक्ती मिडीयाशी बोलताना सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!