Disha Shakti

सामाजिक

राहुरी कृषी विद्यापीठातील अधिकारी डॉ.भीमराज नजन 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

Spread the love

राहुरी प्रतिनिधी /  रमेश खेमनर  : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी वनस्पती शास्त्र विभागात कार्यरत असणारे सहयोगी प्राध्यापक डॉ.भीमराज नजन हे आपल्या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून सेवानिवृत्त झाले आहॆ. त्यांच्याकडे अ.भा.स.स.वनशेती प्रकल्पाचा प्रभारी अधिकारी पदाचा व चारा पैदासकार सह आहरण व संवितरण अधिकारी पदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. डॉ. नजन हे 1993 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सेवेत वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदावर ऊस संशोधन  केंद्र पाडेगाव येथे रुजू झाले होते. व सेवानिवृत्तीच्या वेळी राहुरी विद्यापीठात कृषी वनस्पती शास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक या पदावर ते सेवानिवृत्त झाले.

त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे ऊस या पिकांवर काम केले त्यानंतर त्यांची बदली कसबे डिग्रज सांगली येथे झाली तेथे त्यांनी भुईमूग पिकांवर काम केले त्यानंतर सोलापूर व नंतर त्यांची बदली महात्मा फुले कृषी विद्यापीठ कॅम्पस येथे बियाणे विभाग व त्यानंतर कृषी वनस्पती शास्त्र विभागाच्या वनशेती प्रकल्पाच्या प्रभारी अधिकारी पदी त्यांची वर्णी लागली त्यांनी वनशेती प्रकल्प येथे बांबू पिकांवर काम केले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या ऊस, भुईमूग सह ७ पिकांच्या वाणांच्या संशोधनासाठी त्यांचे मोलाचे योगदान लाभले. याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

डॉ.नजन यांचा सेवापुर्ति सोहळा कृषी वनस्पती शास्त्र विभाग येथे पार पडला त्यांना शॉल नारळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख डॉ.विजू अमोलिक हे अध्यक्षस्थानी होते तर यावेळी प्रमुख उपस्थिति सहयोगी संशोधन संचालक व कापूस पैदासकार डॉ.राजेंद्र वाघ, वनस्पती शास्त्र विभागातील अधिकारी डॉ.मुकुंद भिंगारदे, डॉ.जी.सी.शिंदे, औषधी सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे डॉ.विक्रम जांभळे, कृषी सहाय्यक बापु अडसूरे, प्रदीप आग्रे, श्रीमती राठोड, श्रीमती लांबे, लिपिक श्रीमती भारमल, कर्मचारी पटेल, वसंत पवार, संपत ठुबे, विशाल निमसे, रावजी पठारे, अतुल डाडर, सुनील सगळगीळे, अभिजीत तोडमल, सूरज देवकर, आदी यावेळी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!