इंदापूर तालुका प्रतिनिधी /सुधीर लोखंडे : शिवदास जगन्नाथ गाडेकर 35 वर्षांच्या सेवेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झाले. शिवदास जगन्नाथ गाडेकर ( मामा ) यांचे मुळगाव कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे, आई वडील, दोन बहिणी, एक भाऊ हे त्यांचे कुटुंब कळस या ठिकाणी नाभिक समाजात जन्मलेले ,अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले, प्रतिकूल परिस्थिती त्यांनी आपले शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण केले व कल्याण डोंबिवली महानगरपालिका या ठिकाणी रुजू झाले. त्यांनी कामावर असतानाही देखील वेगवेगळ्या परीक्षा देत महानगरपालिकेत (जकात नाका , शॉप लायसन विभाग) वेगवेगळ्या पदावरती काम केले.
शून्यातून विश्व निर्माण करणारे अत्यंत हुशार, बौद्धीक कुशलता, चाणक्य बुद्धिमत्ता , नम्रता सर्वांना सामावून घेण्याची शक्ती इत्यादी. तेथील कर्मचाऱ्यांना देखील काम करण्याची पद्धत व कल्पकता वेळोवेळी दिसत होती. त्यांनी तेथे केलेले काम अनेक कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी ठरेल , सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते थोडे भाऊक झाले, आई-वडिलांप्रती , पत्नी, आप्तेष्ट, नातेवाईक , कर्मचारी यांनी दिलेल्या पाठबळावर इथपर्यंत येऊन पोहोचलो , अशी भावना व्यक्त केली व भविष्यात येणाऱ्या अडीअडचणीवर बुद्धीच्या जोरावर कशी मात करायची हा कानमंत्र दिला.
शिवदास जगन्नाथ गाडेकर 35 वर्षांच्या सेवेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून सेवानिवृत्त

0Share
Leave a reply