Disha Shakti

सामाजिक

कृषी दिनानिमित्त तमनर आखाडा येथे भानसहिवरे येथील कृषी दुतांनी केला कृषी दिन साजरा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे दि. १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधुन भानसहिवरे येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय येथील कृषी दुतांनी गावातून वृक्षदिंडी काढत वृक्षारोपण केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला तमनर आखाड्याचे कृषी अधिकारी सागर खोंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयातील कृषी दुतांनी उपस्थित शेतकरी , ग्रामस्थ, विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

आजच्या काळात आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचे दिसून येत आहे. हे जर आपणास थांबवायचे असेल तर त्यासाठी वृक्षारोपण हे गरजेचे आहे, जेणेकरून मानवी जीवन सुखमय होईल असे खोंडे साहेब यांनी बोलताना सांगितले. तसेच शेतकऱ्यांचा विविध सरकारी योजनांबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

या वेळी ग्रामसेवक रविंद्र तमनर, सरपंच मनिषा तमनर, उप. सरपंच विजया तमनर, लिपिक अशोक तमनर, सोसायटी संस्थापक चेअरमन गंगाधर तमनर, आप्पासाहेब तमनर,  पा. पु.कर्मचारी एकनाथ तमनर, ग्रा. सदस्य अशोक तमनर, मच्छिंद्र तमनर, विलास तमनर व ग्रामसदस्या संगीता तमनर, मंदा तमनर, सोनाली तमनर तसेच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गायकवाड, साळवे सर व सर्व शिक्षक यांसह कृषीदुत अमित्य जाधव, संकेत गुंड, अभिषेक गोडे, निखिल गोडसे,निलेश बैरागी उपस्थित होते. तर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश तुरबतमठ, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एम. आर. माने, कार्यक्रम अधिकारी प्रा. यु. व्ही.महाजन, प्रा. जे. बी. खकाळे यांचे मार्गदर्शन लाभले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!