पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : तालुक्याच्या उत्तर भागातील अति दुर्गम भागातून जाणारा वनकुटे पळशी रस्ता नादुरुस्त झाला आहे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूकही सुरू असते. रस्ता खराब झाल्यामुळे ग्रामस्थांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो. रस्त्याचे काम होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वनकुटे गावच्या सरपंच सुमन रांधवन यांनी मागणीचे निवेदन दिले आहे तसेच पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड यांनी हा रस्ता दुरुस्त व्हावा ही मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की वनकुटे ते पळशी रस्ता हा अतिशय खराब झाला असून त्यावरून ये जा करणे नागरिकांसाठी अतिशय धोकेदायक झालेले आहे. वनकुटे गावातील वृद्ध व्यक्ती सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पळशी येथे ये जा करत असतात मध्यंतरी या रस्त्यामुळे अनेक नागरिकांचे अपघात झालेले आहेत तसेच या रस्त्यावरून लहान मुलांच्या शाळेच्या बस रोज येत जात आहेत त्यांनाही रोज या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तरी कृपया या रस्त्याचे काम त्वरित व्हावे अशी दोनही गावच्या ग्रामस्थांची आपणास मागणी आहे अन्यथा दोनही गावातील सर्व ग्रामस्थ आपल्या कार्यालयासमोर बसून उपोषण करण्याच्या तयारीत आहेत याची आपण नोंद घ्यावी. असे बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या संदर्भात असलेला प्रवाशांचा त्रास लक्षात घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वनकुटे सरपंच रांधवन व पळशी सरपंच राठोड यांनी केली आहे.
पळशी-वनकुटे भागातील अनेक ग्रामस्थांना रस्त्याने जावे यावे लागते या भागात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतो. प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन रस्ता लवकर दुरुस्त करावा. अन्यथा वनकुटे व पळशी ग्रामस्थांना घेऊन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये उपोषणाला बसणार आहे.
प्रकाश राठोड (सरपंच, पळशी ग्रामपंचायत)वनकुटे भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो. पळशी या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. आर्थिक व्यवहाराच्या निमित्ताने वृद्धांना ये जा करावी लागते. तसेच खडकवाडी भागात शाळा कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांना जावे लागते वनकुटे- पळशी रस्ता नादुरुस्त झाला आहे त्वरित रस्ता दुरुस्त करावा अन्यथा उपोषणाची हत्यार आम्हाला उपसावे लागेल.
डॉ. नितीन रांधवन (ग्रामस्थ, वनकुटे)
वनकुटे-पळशी रस्त्याची दुरावस्था; उपोषणाचा इशारा प्रवाशांची गैरसोय; रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

0Share
Leave a reply