अहमदनगर प्रतिनिधी / इनायत अत्तार : निवडणूक आचारसंहिता असल्याने पोलीस अंमलदारांच्या रखडलेल्या जिल्हांतर्गत प्रशासकीय व विनंती बदल्या येत्या पंधरवड्यात होण्याची चिन्हे आहेत. पोलीस भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत. दरम्यान, अंमलदारांसह काही पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्यांच्याही बदल्या करण्यात येणार असल्याचे ओला यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपूर्वीच पोलीस अंमलदारांकडून विनंती बदल्यांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ही प्रक्रिया ठप्प होती. त्यानंतर शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता सुरू होती. तसेच, पोलीस भरतीची प्रक्रियाही सध्या सुरू आहे. जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पोलीस अंमलदारांच्या बदल्या होणार आहेत. विनंती अर्ज, प्रशासकीय बदल्या भरती प्रक्रियेनंतर केल्या जातील. अंमलदारांसह काही पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्याही करण्यात येणार असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.
Leave a reply