Disha Shakti

क्राईम

राज्य उत्पादन शुल्क पथकाची उक्कलगाव येथे हातभट्टी गावठी दारू विक्री व अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार  : दिनांक ०२/०७/२०२४ रोजी भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, श्रीरामपूर-१ यांनी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांच्या आदेशानुसार संयुक्तरित्या गुन्हा अन्वेषण मोहीम राबवून मौजे उक्कलगाव, ता. श्रीरामपूर या ठिकाणी हातभट्टी गावठी दारू विक्री व अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या केंद्रांवर कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २, श्रीरामपूर चे निरीक्षक श्री अनुपकुमार देशमाने यांनी दिली.

सदर कारवाई मध्ये एकूण ०२ गुन्हे नोंद करण्यात आले असून १० ली. हातभट्टी गावठी दारू, ९५.०४च.ली. (१८० मिली च्या ५२८ बॉटल) देशी दारू, २५.५६ (१८०मिली च्या १४२ बॉटल) विदेशी दारू, ५.२ ब.ली. (६५० मिली च्या ०८ बॉटल) बिअर एवढा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमालाची एकूण किंमत रु.८४,३८०/-रु इतकी आहे. सदर कारवाईत एकूण ०३ आरोपी वर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरील कारवाई श्री. प्रमोद सोनोने, अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रवीण कुमार तेली, उपअधीक्षक, अहमदनगर, श्री. अनुपकुमार देशमाने, निरीक्षक, भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर, श्री. प्रशांत पाटील, दुव्यम निरीक्षक, श्रीरामपूर विभाग-१, दुय्यम निरीक्षक श्री. जी.एन. नायकोडी, श्री. निलेश पालवे, श्री. सुनील पवार, दिवाकर वाघ, कु. प्राची देखणे तसेच जवान नि वाहन चालक श्री. एन.एम. शेख, दीपक बर्डे यांनी सहभाग घेतला आहे.

यापूर्वी निरीक्षक, भरारी पथक क्र.-२ श्रीरामपूर, या कार्यालयाने माहे फेब्रुवारी २०२४ ते जून २०२४ अखेर एकूण ०६ आरोपी विरुद्ध ०६ गुन्हे म. दा. अधी. १९४९ नुसार नोंद करण्यात आलेले आहेत. तसेच निरीक्षक, श्रीरामपूर विभाग या कार्यालयाने एकूण ०५ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत तसेच वरीलपैकी ०३ सराईत आरोपीविरुद्ध म. दा. अधी. १९४९ च्या कलम ९३ अन्वये मा. प्रांत अधिकारी/उप विभागीय दंडाधिकारी सो. यांचेकडे प्रत्येकी रु. एक लाखाचे बंधपत्र प्रस्तावित करून पैकी दोन आरोपी कडून बंधपत्र घेण्यात आलेले आहे.

अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र २ श्रीरामपूर यांनी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!