दिशाशक्ती सटाणा / विट्ठल ठोंबरे : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल सटाणा येथील विद्यार्थिनी कु.वेदिका दिपाली श्रावण अहिरे हिने उत्तुंग यश संपादन करून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातून 180 रँक मिळवत आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल ची शिष्यवृत्ती यशाची परंपरा कायम ठेवून म.वि. प्र.चे नाव उंचावले आहे.
या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन व तिची मेहनत यातूनच मी राज्यात चांगल्या रँक ने येऊ शकले असे कु.वेदिका श्रावण अहिरे या विद्यार्थिनीने सांगितले. कौतुकाचा वर्षाव करत, म.वि.प्र संस्थेचे सरचिटणीस मा. ऍड.नितीनजी बाबुराव ठाकरे, मा.श्री दिलीप (भाऊसा) दळवी (चिटणीस), बागलाण तालुका संचालक डॉ.प्रसाददादा सोनवणे, महिला संचालिका मा.श्रीमती शालनताई सोनवणे, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच शालेय समितीचे अध्यक्ष सुनील दादा सोनवणे व सर्व सदस्य, ग.शि.बागलाण तालुका श्रीम.चित्रा देवरे , शि.विस्तार अधिकारी मा. श्री.विजय पगार, शि.विस्तार अधिकारी श्री.हिरालाल बधान, केंद्रप्रमुख विजय पगारे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.वैशाली सोनवणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी तिचा व तिच्या पालकांचा सत्कार करुन विद्यार्थिनीचे अभिनंदन केले.
Homeशिक्षण विषयीआदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल सटाणा येथील विद्यार्थिनी कु. वेदिका दिपाली श्रावण अहिरे शिष्यवृत्ती साठी पात्र….
आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल सटाणा येथील विद्यार्थिनी कु. वेदिका दिपाली श्रावण अहिरे शिष्यवृत्ती साठी पात्र….

0Share
Leave a reply