राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील शेणवडगाव येथील हरिभाऊ भिकाभाऊ शिंदे या शेतकऱ्यानी महावितरणविरुद्ध न्यायालयात स्वतःच स्वतःची बाजू मांडली, नुसतीच मांडली नाही तर ती केस देखील ते जिंकली आहेत. न्यायालयात केस लढायची म्हटले की आपल्यासमोर न्यायाधीश, वकील तेथील नियम असे चित्र निर्माण होते. मात्र वकिलाशिवाय आपण केस लढू शकत नाहीत. मात्र राहुरीतील शेतकऱ्याने हे स्वतः केस लढवून स्वतःला सिद्ध करून खऱ्याला न्याय मिळतो हे दाखवून दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील शेणवडगाव येथील हरिभाऊ भिकाभाऊ शिंदे यांच्या गट नं. ६७/१ मधील १/४१ आर ऊस महावितरणच्या गलथान कारभारामुळे दि. ५ मार्च २०१६ रोजी शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत खाक झाला होता. महावितरणच्या गलथान कारभारामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी म्हणून हरिभाऊ शिंदे यांनी वेळोवेळी महावितरण कंपनीकडे मागणी केली होती. त्यांना न्याय न मिळाल्याने शिंदे यांनी ग्राहक मंच, अहमदनगर येथे अपिल केले होते. त्याठिकाणी शिंदे यांच्या बाजूनेच निकाल लागला.मात्र या निकालाविरोधात महावितरण कंपनीने तक्रार निवारण आयोग, संभाजीनगर यांच्याकडे अपिल केले होते.
त्याठिकाणी हरिभाऊ शिंदे यांनी वकील न लावता आपली बाजू स्वतःच मांडली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेवून तक्रार निवारण आयोगाचे मिलींद सोनवणे व नागेश कुमभरे यांनी हरिभाऊ शिंदे यांना दि. १२ ऑगस्ट २०१६ पासून ९ टक्के व्याजासह एक लाख २० हजार नुकसान भरपाई, २५ हजार रुपये मानसिक त्रासापोटी तसेच १० हजार दाव्याच्या खर्चापोटी देण्याचे आदेश महावितरण कंपनीला दिले आहेत. शिंदे यांनी वकील न लावता आपली बाजू भक्कमपणे मांडली. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. शॉर्टसर्कीटमुळे आग लागून उसाचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळते हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांचे अनेक ठिकाणी कौतूक होत आहे.
राहुरीतील शेतकऱ्याने महावितरणा विरोधात दिला लढा, वकील न लावता स्वतःची केस स्वतःच लढला अन जिंकलाही

0Share
Leave a reply