राहुरी प्रतिनिधी / आर आर जाधव : राहुरी तालुक्यातील वरंवंडी येथील ग्रामपंचायतीमध्ये मोठ मोठे घोटाळे झाले असल्याचे रविवारी झालेल्या ग्राम सभेत पितळ उघडे पडले आहे रविवार दि. ७/७/२०२४ रोजी सकाळी शासनाच्या आदेशाने वरवंडी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजीत करण्यात आली होती . या ग्रामसभेमध्ये अनेक विषयावर चर्चा होत असताना उपस्थीत ग्रामस्थांनी काही प्रश्न उपस्थीत केले मात्र ग्रामसेवक , सरपंच यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत कामे अनेक ठेकेदार एक ही पद्धत चालु असल्याने त्याचा मंजुर झालेल्या कामावर मोठा परिणाम होताना दिसुन येत आहे सदर ठेकेदार वारंवार निकृष्ट कामे करत असताना कायम त्यालाच काम का दिले जाते याचा जाब नागरीकांनी विचारताच ग्रामसेवक सरपंच यांनी कोणतेही उत्तर न देता गप्प बसले कायम काम करणारा ठेकेदार मुळानगर वसाहतीत रहात असल्याने मुळानगर येथुन निवडून आलेल्या सदस्याचा तो जोडीदार आहे त्याच सदस्याच्या दमदाटीने घ्या ठेकेदारास कामे दिली जातात असे इतर सदस्यांचे म्हणणे आहे वास्तविक पहाता ह्या सदस्यांनी मुळानगर शासकीय वसाहतीतील खोल्या बळकावल्या असुन अतिक्रमण करून राहात आहेत मात्र ग्रामस्थांनी सहानुभुतीने त्यांचे विरुद्ध तक्रार नोंदी केल्या नसल्याचा गैरफायदा हा सदस्य घेत आहे.
या ठेकेदाराने निकृष्ट कामे करूनही त्यालाच काम का देता ? असा प्रश्न उपस्थित केला असता हा ठेकेदार पंचायत समिती राहुरीच्या संबंधीत इजिनिअर पासुन सरपंच ग्रामसेवकां पर्यंत टक्केवारी देत असल्याचे ग्रामसभेत ऐकण्यास मिळाले. १,२७,०००/- रुपयांचे पथदिव्यांचे काम मंजुर करण्यात आले. मात्र अंदाजपत्रकात लिहील्या प्रमाणे हे काम झालेच नसल्याची माहिती उघड झाली आहे तर काम पुर्ण झाल्याचा दाखला ही या ठेकेदारास देण्यात आला आहे मात्र हे पथदिवेच गायब झाले आहेत गावात बिबट्याची दहशत असताना रस्ते आजरोजी आंधारात आहे ग्रामसेवक व सरपंचानी या कामात मोठा डल्ला मारला असल्याचे इतर सदस्यांनी ग्रामसभेत सांगीतले.
या पुर्वी गावातील एका तरुणाने केवळ २१००० रुपयात ३५ दिवे बसवले होते मात्र ह्या १९ दिव्यांना १२७००० हजार . रुपये कसे लागले असा प्रश्न निर्माण होतो हरिजन दफन भुमीसाठी पेव्हीग ब्लॉक बसविण्याचे दहा ब्रास काम मंजुर झाले असुन यासाठी ८३००० इतके रुपये मंजुर झाले आहे हे काम देखील त्याच ठेकेदाराला दिले आहे इतर खाजगी ठिकाणी हेच काम ६००० रु ब्रासने केले जाते मग ग्राम पंचायतीच्या दरात एव्हडी तफावत का ? ग्रामपंचायती कडे ग्रामस्थांचे लक्ष नसल्याचा गैरफायदा सरपंच ग्रामसेवक घेत असल्याचे उघड झाले आहे.
पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रणालीच्या कामकाजाची पुर्ण माहीती व अनुभव असलेले उच्च शिक्षित जगदिश भालेराव हे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी मध्यंतरी वरवंडी ग्रामपंचायतीला चांगली शिस्त लावली होती परंतु भ्रष्ट ग्रामसेवक सरपंच शासकीय अतिक्रमण करून राहात असलेले सदस्य तसेच टक्केवारीत सामील असलेले सदस्यांनी त्यांचेवर दबाव टाकुन गप्प बसल्याची कबुली दस्तुरखुद सदस्यांनी ग्रामसभेत सांगीतली.
वरवंडी ग्रामपंचायती मधे मनमाणी कारभार करणारे सरपंच, ग्रामसेवक, इतर सदस्य , काम पुर्ण नसताना पुर्णत्वाचे डोळेझाक पणे दाखले देणारे पंचायात समितीचे संबंधीत आधिकारी यांचे मनमानी कारभाराला मा गटविकास अधिकाऱ्यांनी आळा घालावा अशी मागणी वरवंडी ग्रामस्थांकडून होत आहे यासाठी वरवंडी ग्रामस्थ लवकरच उपोषणाचा इशारा देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले
Leave a reply