Disha Shakti

इतर

राहुरीत तालुक्यात सुगंधी तंबाखू व माव्याची सर्रास विक्री, अन्न व औषध विभागाचा कानाडोळा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राज्य सरकारने सुवासिक तंबाखू व गुटख्यावर बंदी घातली असली, तरी राहुरी शहरात व तालुक्यात मात्र गुटख्याबरोबर सुवासिक तंबाखू वापरून केलेला मावा सर्रास विकला जात आहे. यासाठी दररोज किमान क्विंटलहून अधिक बारीक केलेली सुपारी व सुवासिक तंबाखू विकली जात असल्याची माहिती समजली. राहुरी तालुक्यातील ग्रामिण भागात व शहरातील अनेक पानटपर्‍यांच्या बाहेर टायरच्या तुकड्यांवर मावा बनवण्यासाठी प्लास्टिकच्या पुरचुंड्या घासण्याचे दृश्य सर्रास दिसत आहे. फक्त अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनाच ते कसे दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित करून तरुणाईला व्यसनाधीनतेतूून कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीकडे घेऊन जाणार्‍या या प्रकाराकडे संबंधित सरकारी विभागांचे दुर्लक्ष अक्षम्य असल्याची संतप्त प्रतिक्रिया राहुरीकरांमधून व्यक्त होत आहे.

राहुरीतील तंबाखूजन्य माव्याला ग्रामिण भागत मोठी मागणी आहे. अनेक गावात ‘येथे अमुक मावा मिळेल’ अशा पाट्या बिनधास्त दिसतात. यात बारीक कुटलेली सुपारी, विशिष्ट क्रमांक असलेल्या तंबाखू, चुना एकजीव करण्यासाठी अगदी थोडे पाणी वापरले जाते. हे सर्व मिश्रण रबरी खडबडीत टायरच्या तुकड्यांवर तासंतास घासले जाते. त्यामुळे ते एकजीव होते. आता हा प्रकार बनवण्यासाठी काही टपरी चालकांनी यंत्रेही बनवून घेेतली आहेत. पण हाताने घासून तयार केलेल्या माव्याला अधिक मागणी असल्याची माहिती समजते. राहुरीत तयार झालेला मावा लहान-लहान पुड्यांतून ग्रामिण भागत पोहचविला जातो. या व्यवसायातील प्रचंड उलाढालीमुळे अनेकांचे उखळ पांढरे होत आहे.

सुवासिक तंबाखूवर बंदी असतानाही राहुरीत इतकी सुगंधीत तंबाखू विना अडथळा कशी येत आहे. कारण यात संबंधित सरकारी खात्यांतील लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याचे बोलले जाते. गेल्या वर्षभरात या मावा विक्रेत्यांवर एकही मोठी कारवाई झाली नाही. यामागे हेच आर्थिक हितसंबंध असल्याची उघड चर्चा होत आहे. यातच सर्व काही स्पष्ट होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!