Disha Shakti

क्राईम

शेत तळ्यातील इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे चोरटे राहुरी पोलीसांकडुन जेरबंद

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : लाख शिवारातील संकेत सुभाष गल्ले हे दिनांक 07/07/2024 रोजी दुपारी 02.00 वाजेच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यासाठी शेत तळ्याजवळ गेले तेव्हा शेत तळ्याजवळ पाईप व केबल तोडलेले दिसल्याने त्यांनी शेत तळ्याच्या भिंतीवर जाऊन पाहीले असता शेत तळ्यातील मोटार पाईप व केबल तोडुन चोरुन नेल्याची दिसली व तीन ईसम ऊसाच्या पिकातुन एका पोत्यात काहीतरी घेऊन रोड कडे जात असल्याचे दिसल्याने संकेत गल्ले हे त्याच्या दिशेने गेले तेव्हा तेथे इसम 1) आयुब उर्फ लुण्या नसीर पठान 2) सुनिल संजय जाधव 3) अमोल दत्तु पवार सर्व रा. मुसळवाडी ता. राहुरी जि. अहमदनगर हे होते.

त्यावेळी त्या इसमांनी ते पोते मोटार सायकलला बांधले. संकेत गल्ले रोडवर मोटार सयाकल जवळ गेल्यावर त्यांनी त्या तीन इसमांना पोत्यात काय आहे असे विचारले असता तीन इसमांनी संकेत गल्ले यांना पोत्यात काय आहे हे दाखवण्यास विरोध केल्याने व त्या पोत्यात आपलीच मोटार असल्याचा संशय आल्याने त्यांनी मोटार सायकल वर बांधलेल्या गोणीत पाहीले असता संकेत गल्ले यांचीच मोटार असल्याचे त्यांनी ओळखल्याने संकेत गल्ले यांनी त्या तिघांना तुम्ही माझी मोटार का चोरुन घेऊन जात आहेत असे म्हणुन मोटार सायकलवरुन इलेक्ट्रीक मोटार काढुन घेत असतांना त्या तीन चोरट्यांनी संकेत गल्ले यांना मारहान करुन बळजबरीने मोटार घेऊन जाऊ लागले त्यावेळी शेता शेजारील लोक जमा झाल्याने व त्यांनी पोलीसांना फोन केल्याने तात्काळ पोलीस तेथे गेले व त्या तीन चोरट्याचा पाठलाग केला असता आयुब उर्फ लुण्या नसीर पठान 2) सुनिल संजय जाधव या दोन चोरट्यांना पोलीसांनी व आजु बाजुच्या शेतकऱ्यांनी पकडले व अमोल दत्तु पवार हा चोरटा मोटार सायकलवर पळुन गेला.

संकेत सुभाष गल्ले यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघा चोरट्यांना मा. न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील श्री. गागरे साहेब यांनी सरकार पक्षा तर्फे बाजुन माडली. अटक असलेल्या चोरट्यांना मा. न्यायालयाने 04 दिवस पोलीस कोठडी सुनवण्यात आली. अटक असलेल्या चोरट्यांकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा तपास पोनि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि. धर्मराज पाटील, पोकॉ. गणेश लिपने करत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.डॉ. बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे, पोउपनि. धर्मराज पाटील, सफौ. विष्णु आहेर, पोहेकॉ. राहुल यादव, पोना. प्रविण बागुल, पोकॉ. प्रमोद ढाकणे, पोकॉ. गणेश लिपने, पोकॉ. नदिम शेख, संतोष राठोड यांनी केलेली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!