दिशाशक्ती न्यूज नेटवर्कi : बारामती मधील पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जागतिक जयंती उत्सवात महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे,असे आवाहन धनगर समाजातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी समाज बांधवांना केले आहे.
11 आगस्ट 2024 रोजी बारामती येथील रयत भवन मंगल कार्यालय, मार्केट यार्ड या ठिकाणी पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जागतिक जयंती उत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष वर्ल्ड धनगर सोशल आर्गनाझेशन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षा महासंघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.या जयंती उत्सवात सत्कार समारंभ, पुरस्कार वितरण सोहळा, करिअर मार्गदर्शन, ज्या महिला सामाजिक कार्यात सहभागी असतात, आपल्या गावांसाठी समाजासाठी योगदान दिले आहे,10 वी,12 वी प्रथम क्रमांक पटकावलेल्या मुला मुलीचे सत्कार, एमपीएससी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्याचे सत्कार, आदी भरगच्च कार्यक्रम या जयंती उत्सवात आयोजित करण्यात आले.
या जयंती उत्सवात पालक व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे,असे बबनराव आटोळे यांनी कळविले आहे.तसेच अधिक माहितीसाठी बबनराव आटोळे अध्यक्ष मोबाईल नंबर 9923584072 ला संपर्क साधावा.बारामती मधील पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जागतिक जयंती उत्सवात धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केले आहे.
बारामती मध्ये पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जागतिक जयंती उत्सवात धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे भारत कवितके यांचे आवाहन.

0Share
Leave a reply