राहुरी प्रतिनिधी / जावेद शेख : राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील गट क्रमांक 53 मधील झालेल्या अवैध उत्खन् ना बाबत कारवाई होणेसाठी मागील 10 दिवसापासून चालू असलेले उपोषण आर.पी.आय. ( A गट) च्या मध्यथीने स्थगित करण्यात आले.उपोषणकर्त्या महिला मंगल विनायक विधाते दि. 02/07/2024 पासून तहसील कार्यालया समोर ताहाराबाद येथील गट क्रमांक 53 मध्ये झालेल्या उत्खनन कारवाई साठी बसल्या होत्या, प्रशासकीय स्तरावर तलाठी ताहाराबाद याने त्या क्षेत्रा मधील झालेल्या मुरून उत्खनंन् चा 50 ब्रासचा पंचनामा अहवाल तहसीलदार यांना सादर केला.
परंतु उपोषण कर्त्यांच्या म्हणण्या नुसार झालेले उत्खनन 600 ते 700 ब्रास अंदाजे आहे ,तहसीलदार यांनी 50 ब्रास मुरूम् उत्खनन नोटीस ही उपोषण कर्त्याला मान्य नसल्या मुळे उपोषण सोडविण्या करिता प्रशासनाला तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या 3 ते४ वेळा तहसीलदार यांनी उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न केले .
परंतु त्यामध्ये मार्ग निघू शकला नाही,अखेर आर.पी आय उत्तर महाराष्ट्र आयउपाधयकष प्रविनभाऊ लोखंडे ,आर.पी .आय तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे ,नवीन साळवे, बबन साळवे,योगेश पवार रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष ,संदीप साळवे, रॉबर्ट स्याम्युअल, माधव विधाते, विधाते सर ,या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्याशी तांत्रिक अडचणी बाबत चर्चा केली, कारवाई बाबत महसूल आधी नियमातील मुदती बाबत लागणारा कालावधी व उपोषण कर्त्याची फेर पंचनामा मागणी या विषयी चर्चा झाल्यानंतर व तहसीलदार यांनी उपोषण कर्त्या महिला यांनीं उपोषणा करिता केलेली मागणी या बाबत साकारात्मक भूमिका घेतली .
परंतु दंड कोणाला करायचा असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या बाबत सविस्तर अहवाल पुनच्ष करण्याच्या सूचना देऊन उपोषणाचामार्ग मोकळा केला .मागील 10 दिवसा पासून महसूल प्रशासना कडे न्याय मागणाऱ्या मंगल विधाते यांना कारवाई बाबत लेखी व तोंडी आश्वासन आर.पी. आय. कार्यकर्त्यांच्या मध्यथीने दिल्यात आल्यामुळे गरीब शेतकरी महिलेला अखेर न्याय मिळालेची भावना निर्माण झाली,उपोषण सोडिवताना उपोषणार्थी यांनी आर.पी .आय कार्यकर्त्याचे आपल्या तहसीलदार नामदेव पाटील साहेबांचे मनपूर्वक आभार मानले व आपल्या आश्रुना वाट मोकळी झाली…..
ताहाराबाद येथील मुरूम उत्खनन कारवाई करिता चालू असलेले उपोषण आर.पी. आय (A गट) च्या मध्यथीने स्थगित

0Share
Leave a reply