राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील उंबरे येथील बाजारपेठेमध्ये दळणवळणांचा असणाऱ्या भंडारी चौकातील रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक जण या खड्ड्यात पडल्यामुळे जखमी झाले आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने व राजकीय पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांनी केली आहे.
उंबरे येथील भंडारी चौकातून उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शाळेकडे, मारुती मंदिराकडे, सज्जनवाडी, मोरवाडी आदी परिसराकडे रस्ते जात आहेत. हा चौक अपघाताच्या दृष्टीने अतिशय संकटमय चौक झाल्यामुळे या चौकाचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. हा रस्त्यावर काही ठिकाणी काटेरी झाले वाढलेली आहेत. फक्त दोनशे फूटच या रस्त्याचे काम बाकी असताना पहिल्याच पावसामध्ये या रस्त्याची भयानक दुरावस्था झाली आहे. शाळकरी मुले, दूधवाले यांचे अनेक वेळा या चौकात अपघात झाले आहे. अशी परिस्थिती सुज्ञ नागरिकांना माहीत असून सुद्धा ग्रामपंचायत
या चौकाचे रुंदीकरण करण्यासाठी जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे. ग्रामविकास अधिकारी यांनी स्वतः कठोर भुमिका घेऊन या रस्त्याचे काम करून घ्यावे तसेच सर्व शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या धोक्यात असणारा चौक रुंदीकरण करावा, जेणेकरून आपल्या या ठिकाणी अपघात होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अशी मागणी ढोकणे यांनी केली आहे लवकरात लवकर मागणी पूर्ण न झाल्यास राहुरी तहसील व गटविकास अधिकारी यांच्या दालनापुढे प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे
उंबरे गावातील रस्त्याच्या दुरूस्तीसाठी प्रहारचे आप्पासाहेब ढोकणे यांचा आंदोलनाचा इशारा

0Share
Leave a reply