दिशाशक्ती न्यूज मुंबई : भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम येथील जेष्ठ पत्रकार, कवी, लेखक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांची सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल “समाज भूषण पुरस्कार २०२४” करीता निवड करण्यात आल्याचे बबनराव आटोळे राष्ट्रीय अध्यक्ष वर्ल्ड धनगर सोशल आर्गनाझेशन यांनी भारत कवितके यांना कळविले आहे.११आगस्ट २०२४ रविवार रोजी दुपारी १२ वाजता बारामती येथील रयत भवन मंगल कार्यालय, मार्केट यार्ड या ठिकाणी पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जागतिक जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार भारत कवितके यांना देण्यात येणार आहे.
यावेळी या जागतिक जयंती उत्सवात सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवरांना समाज भूषण पुरस्कार तर ज्या महिला सामाजिक कार्यात सहभागी असतात त्या महिलांना अहिल्या रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या प्रसंगी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.भारत कवितके यांनी आपल्या पत्रकारिता व्दारा, साहित्यातून व सामाजिक कार्यातून धनगर समाजात उल्लेखनीय कार्य केलेले आहे.पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर, मल्हाराव होळकर यांच्या जयंत्या,व पुण्यतिथ्या करून आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, पर्यावरण महत्त्व, जलसंवर्धन जागृती, चष्मा शिबीर,व इतर शिबिरे, आयोजित करून सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा भारत कवितके यांनी उमटविला आहे.
प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडिया मार्फत समाजाच्या आंदोलनाच्या, उपोषणाच्या, बातम्या देऊन समाज हित भारत कवितके यांनी जोपासले, मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्टेशनला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी अनेकदा निवेदने दिली.पंढरपूर मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या शेजारील खाजगी वाहने हटविली, वगैरे वगैरे सामाजिक क्षेत्रात काम करुन आता पर्यंत धनगर समाजामार्फत यशवंत रत्न, समाज भूषण, समाज रत्न,अहिल्य रत्न, मुंबई रत्न, वगैरे वगैरे पुरस्कार भारत कवितके यांना समाजाकडून मिळालेले आहेत.
समाज भूषण पुरस्कार निवड झाल्यानंतर भारत कवितके यांनी प्रतिक्रिया दिली की,” धनगर समाजातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जागतिक जयंती उत्सवात मला समाज भूषण पुरस्कार मिळत असल्याने मनापासून आनंद होत आहे.या पुरस्कारामुळे माझी समाजाप्रती समाज हिताची कामे करण्याची जबाबदारी वाढली आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.” या जागतिक जयंती उत्सवात धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन बबनराव आटोळे यांनी केले आहे.भारत कवितके यांना समाजाचा समाज भूषण पुरस्कार जाहीर होताच समाजाच्या सर्व थरातून अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव केला जात आहे.
Leave a reply