इंदापूर तालुका प्रतिनिधी /सुधीर लोखंडे : दि.,९ श्री संत सेना महाराज वांगदरी तालुका श्रीगोंदा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा भिगवन या ठिकाणी मंगळवार दिनांक ९ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा तक्रारवाडी या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता दाखल झाला . त्यावेळी भिगवण शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,तक्रारवाडी गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन पालखी सोहळ्याचे उस्फुर्त असे स्वागत केले. सात ते नऊ जाधव महाराज यांचे मनाला मंत्रमुग्ध करणारे कीर्तन झाले, त्यानंतर नाभी बांधवांचे वतीने आलेल्या वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी भिगवन नाभिक संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, सचिव सचिन राऊत, कार्याध्यक्ष आबासाहेब साळुंखे, मार्गदर्शक रमेश गायकवाड, प्रकाश दळवी, सुधीर लोखंडे, प्रमोद लोखंडे ,विनोद लोखंडे, वसंत लोखंडे ,दीपक मोरे ,बाळासाहेब मोरे, विठ्ठल गायकवाड, प्रभाकर लोखंडे, श्रीकांत काशीद, उमेश गाडेकर, इत्यादी नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply