Disha Shakti

इतर

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेबाबत खा.निलेश लंके यांचा गंभीर आक्षेप, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांच्यासह पोलीस महासंचालकांकडे तक्रार

Spread the love

अहमदनगर  प्रतिनिधी /  वसंत रांधवण :  पोलीस खात्यातील स्थानिक गुन्हे शाखेमध्ये सुरू असलेल्या हप्तेखोरीकडे खा. नीलेश लंके यांनी लक्ष वेधले असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह शाखेतील कर्मचाऱ्यांची खा. लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेटटीवर, अंबादास दानवे, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. सात दिवसांत कारवाई न झाल्यास नगरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयापुढे सबळ पुराव्यांसह उपोषण करण्याचा इशारा खा. लंके यांनी दिला आहे.

खा. लंके यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये नमुद केले, जिल्ह्यामध्ये जनतेचे रक्षक असणारे पोलीस खात्यामधील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व इतर कर्मचारी राजरोसपणे हप्ते घेत आहेत. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी असणारा जिल्हा म्हणून नगर ओळखला जातो. बीफ मटन, ऑनलाईन क्लब, वाळू, गुटखा, दारू, गांजा, चंदन तस्करी, मटका, बिंगो हे सर्व व्यवसाय पोलीसांच्या आशीर्वाद व आश्रयाखाली मोठ्या प्रमाणात सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचारी सामान्य जनतेस वेठीस धरीत आहेत. जिल्ह्यातील सुवर्णकार व्यवसाय करणारे सराफ व्यवसायीकांना दमदाटी करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवू असे धमकावतात. यामुळे सर्वांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याच्या तक्रारी येत आहेत. एलसीबीमध्ये कार्यरत असणाऱ्या सात ते आठ कर्मचाऱ्यांचा नावांचा उल्लेख खा. लंके यांनी तक्रारीत केलेला आहे.

 या प्रकरणात एलसीबीचा एक कर्मचारी मास्टरमाईंड असून त्याच्यावर काही वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत काम करताना लाचलुचपत विभागाने कारवाई केलेली आहे. सबंधित केस जिल्हा न्यायालयात प्रलंबित असून नगर शहरातील एका गुन्ह्यामध्ये राज्य गुन्हे अन्वेशन शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. संबंधीत कर्मचारी अन्य पोलीसांवर दबावतंत्र वापरतो. अशा कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करत नसल्याची खंत खा. लंके यांनी यावेळी व्यक्त केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!