राहता प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : राहता तालुक्यातील वाकडी (खंडोबाची) येथील अतिशय गरीब कुटुंबातील तसेच एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली पण लहानपणा पासून जिद्धी. प्राथमिक शिक्षण पासून तर सी. ए. पर्यंतचा प्रवास अतिशय खडतर व वरचडीचा होता.तरीही तिने आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष नं करता आपले स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास चालू ठेवला. स्वप्नालीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लक्ष्मी नारायण विद्यालय वाकडी येथे झाले.त्यानंतर ग्रॅज्युशन सी.डी जैन कॉलेज श्रीरामपूर येथे पूर्ण झाले.
सी.ए परीक्षेच्या तयारी साठी मला अभ्यास अ.नगर येथे जाऊन करवा लागला.आई वडील एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी मला खूप प्रेरणा देली व माझ्या जिद्धीमुळे आज मी इथपर्यंत पोहचले आहे असे त्यांनी सांगितले. शेतकरी बापूसाहेब मारुती जाधव यांची कन्या कु. स्वप्नाली जाधव यांनी सी.ए परीक्षेत यश मिळवल्याबद्दल सर्व सामाजिक, राजकीय स्तरावरून, वाकडी ग्रामस्ताकडून व विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार, नातेवाईक यासार्वांकडून तिच्या यशाचे अभिनंदन,आनंद उत्सव साजरा होतं आहे.
Leave a reply