राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : फिर्यादी सुवर्णा चंद्रभान शिंदे ह्या संगमनेर ते अहमदनगर बस मधून येत असताना त्यांच्या गळ्यातील गंठण व अंगठी हे त्यांनी त्यांच्या जवळील पिशवीमध्ये ठेवले होते त्या बसमध्ये प्रवास करत असताना त्यांच्या जवळील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी चोरून गेली होती. त्यावरून राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 762/2024 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान फिर्यादीने सांगितलेल्या आरोपींच्या रूपरेषा वरून पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये
1.गौरी राम कट्टी
2.दीपा अशोक कट्टी
3.गीता वेंकटेश कट्टी
4.नक्षत्रा कल्याण दुवणी
5.गायत्री तेज सारले
6.रूपा राजू सारले
आरोपी एक ते चार रा.पाथर्डी नाका ता.जी नाशिक अ.न पाच व सहा राहणार वीटभट्टी जवळ संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
या महिलांना अटक करून मा न्यायालयासमोर हजर केले असता सदर आरोपी महिलांची न्यायालयाने वेळोवेळी पोलीस कस्टडी दिली व महिला आरोपी यांच्याविरुद्ध प्रथम दर्शनी गुन्हा दिसून येत असल्याने त्यानंतर मा.न्यायालयाने सर्व महिला आरोपींचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे.सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात सहायक फौजदार ए बी आव्हाड , पो हवा शेळके यांनी केली असून मा.न्यायालयात सरकारी वकील आर के गागरे यांनी शासनाची बाजू प्रभावीपणे मांडली.
Leave a reply