श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर प्रतिनिधी संविधान बचाव समिती श्रीरामपुर, तसेच समस्त मुस्लीम समाज श्रीरामपुर यांच्यावतीने दि. १४/०७/२०२४ रोजी दुपारी विशालगड जि.कोल्हापुर याठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली समाज कंटकाच्या जमावाने तेथील नागरिकांच्या घरावर तलवारी, काठ्या, कोयते असली घातक शस्त्र घेऊन विशिष्ट समाजातील लोकांच्या घराची मोडतोड केली व वाहनांची जाळपोळ केली.धार्मिक स्थळांची विटंबना केली. तसेच महिला व लहान मुले, वृध्द महिला, व पुरुषही या हल्ल्यातुन सुटलेले नाही. त्यांना सुध्दा जबरदस्त मारहाण करण्यात आल्याचे आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले आहे. अशी तीव्र भावना समाजातील नागरिकांनी व्यक्त केली
सदरचा कायदा हातात घेऊन नागरी वस्तीवर हल्ले करुन नागरीकांमध्ये दहशत निर्माण करण्या-या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा जाहिर निषेध करत या सर्व लोकांवर कोणीत्याही व कुठलाही पदाधिका-याच्या पदाचा मुलाहिजा न ठेवता कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी चे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले याप्रसंगी श्रीरामपूर मुस्लिम समाजातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशालगड पायथ्याशी हल्ल्यातील गुन्हेगारावर कारवाई करण्याची श्रीरामपूर मुस्लिम बांधवांच्यावतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी

0Share
Leave a reply