पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील हंगा व रांजणगाव रोड येथील दोन वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार पहिली रांजणगाव रोड येथे घडली आहे. यात संतोष विठ्ठल ढगे (वय 50) रा. रांजणगाव रोड हे मयत झाले आहेत. यांना राहत्या घरीच विजेचा धक्का बसला. त्यांना कुटुंबियांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. कृष्णा कणसे यांनी त्यांना मृत घोषित केले.
दुसरी घटना हंगा येथे घडली असून याबाबत कैलास शिवाजी दळवी यांनी सुपा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, गणेश भास्कर दळवी (वय 36) हे सोमवार (दि.25) रोजी रात्री हंगा शिवारातील घराजवळील पोल्ट्री फार्मवर झोपण्यासाठी गेला असता रात्री 9 ते दुसर्या दिवशी सकाळी 7 च्यादरम्यान विजेचा धक्का लागून मयत आढळून आला. याबाबत सुपा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरिक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संपत खैरे तपास करत आहेत.
पारनेर तालुक्यातील हंगा व रांजणगाव रोड येथे दोन वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू

0Share
Leave a reply