इंदापूर प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ति, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ पंढरीची वारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे अध्यात्मिक , सांस्कृतिक वैभव लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर मुखी विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने , आनंदाने, शिस्तीत वारीत सामील होतात. हा भक्ती रसाचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दिनांक 16 जुलै 2024 – विठ्ठल नामाचा गजर ज्ञानोबा माऊली तुकारामांचा जयघोष करत ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा झाला. प्रथम स्कूलचे अध्यक्ष मा.राजू गायकवाड सर , मा.रोहिणी गायकवाड मॅडम , सचिव मा.ऋषिकेश गायकवाड सर, तेजस गायकवाड सर, खजिनदार मा. तुषार काळे सर, शाळेचे प्राचार्य मा. बाबू सांगळे सर, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. नंतर अश्वरिंगण झाले.
पालखी मिरवणूक स्कूलपासून खडकी गावात श्री भैरवनाथ मंदिरापर्यंत नेण्यात आली. जाताना खडकी ग्रामपंचायत या ठिकाणी पालखी विसाव्यासाठी थांबली .त्या ठिकाणी प्री-प्रायमरीचे चिमुकले व अनेक विद्यार्थिनींनी श्री विठ्ठलाच्या गाण्यावर नृत्य केले . काही विद्यार्थी -विद्यार्थिनींनी टाळ मृदंगाच्या तालावर फुगड्या खेळल्या. सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी ग्रामपंचायत मधील अनेक मान्यवर उपस्थित होते . माजी सरपंच किरण काळे, उपसरपंच मोहन उर्फ काका काळभोर , ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब शिंदे, पोलीस पाटील संदीप काळे, ग्रामपंचायत सदस्य अनिल गुणवरे,सहाय्यक – कृषी विद्यापीठ राहुरी देशमुख साहेब या सर्वांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन संस्थेचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, प्राचार्य यांनी सत्कार केला. उपसरपंच काका काळभोर व हरिश्चंद्र सोनवणे – बारामती यांनी मुलांसाठी पालखी विसावा या ठिकाणी नाश्ता म्हणून मुलांसाठी खाऊ दिला. ग्रामपंचायत येथून पालखीचे प्रस्थान मृदंगाच्या गजरात श्री भैरवनाथ मंदिर या ठिकाणी झाले. तेथे हरिपाठ, भजन व आरती झाले. यावेळी गावकरी दत्तात्रय होले व विश्वास आण्णा काळभोर यांचे विशेष सहकार्य लाभले .सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसाद देऊन दिंडी सोहळा या कार्यक्रमाची सांगता झाली.
ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खडकीत पालखी सोहळा रंगलाटाळ आणि मृदुंगाच्या गजरात

0Share
Leave a reply