राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस स्टेशनच्या रात्रगस्त करणाऱ्या पथकास माहिती मिळाली की , गुहा परिसरामध्ये काही संशयीत लोक टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची मालवाहतूक गाडी व मोटरसायकलने येऊन दरोड्याच्या तयारीने टेहळणी करत आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने राहुरी पोलीस स्टेशन चे रात्रगस्त अधिकारी/ कर्मचारी यांनी व डीबी पथकाने समन्वय साधून माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी एकूण सात संशयीत इसमा पैकी मोटरसायकल वरील तीन इसम मोटरसायकलने पळून गेले.
जागेवर सापडलेल्या चारही इसमांची नावे 1) सुखदेव रामदास खिलदकर वय 30 वर्ष,राहणार नांदूर तालुका आष्टी जिल्हा बीड, 2) साहिल सिकंदर सय्यद वय 25 वर्ष राहणार नांदूर तालुका आष्टी जिल्हा बीड3) अरुण बाळासाहेब बर्डे वय 22 वर्ष राहणार कुरणवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर, 4) सोमनाथ रामदास गायकवाड वय 27 वर्ष राहणार कुरणवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर, असून त्यांचे ताब्यात धारदार शस्त्र, दोऱ्या, स्क्रू ड्रायव्हर, वेगवेगळे पान्हे, केबल कटर, लोखंडी कत्ती, लाइटर असे साहित्य मिळून आले. छापा पथकातील एका टीमने मोटरसायकल वर पळून गेलेल्या आरोपींचा पाठलाग केला असता सदर मोटर सायकल स्वार याचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने ते तिघेही तिथे पडले असता पोलीस पथकाने धाव घेऊन लागली त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यातील आरोपी याला मार लागलेला असल्याने तो पळून जाऊ शकला नाही त्यास ताब्यात घेवून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव.नामे 5)शक्तिमान रामदास गायकवाड राहणार कुरणवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर असल्याचे सांगून इतर दोन पळून गेलेल्या आरोपींची नावे बाळू लहानु गायकवाड व नवनाथ तुकाराम पवार असल्याचे सांगितले.
नमूद सातही आरोपींना विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 310 (4)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्यात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कस्टडी रिमांड कामी मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे.
सदर आरोपी विरुदध वेगवेगळया पोलीस स्टेशनला खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत
अ.क्र. आरोपीचे नाव पोलीस स्टेशन गुरनं व कलम
1 सुखदेव रामदास खिलदकर वय 30 वर्ष,राहणार नांदूर तालुका आष्टी जिल्हा बीड आंभोरा पोलीस स्टेशन जि.बीड 1)63/2024 भादवि 380,457
2)45/2024 भादवि 3792 अरुण बाळासाहेब बर्डे वय 22 वर्ष राहणार कुरणवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर, पारनेर पोलीस स्टेशन 1168/2023 भादवि 399,402
राहुरी पोलीस स्टेशन 923/2022 भादवि 379
3 सोमनाथ रामदास गायकवाड वय 27 वर्ष राहणार कुरणवाडी तालुका राहुरी घारगाव पोलीस स्टेशन 463/2023 भादवि 379,511,34
पारनेर पोलीस स्टेशन 1168/2023 भादवि 399,402
4 शक्तीमान रामदास गायकवाड राहणार कुरणवाडी तालुका राहुरी घारगाव पोलीस स्टेशन 463/2023 भादवि 379,511,34सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो,अहमदनगर, मा.वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात सपोनी देवेंद्र शिंदे, सपोनी रविंद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, चालक पोलीस हवालदार शाकुर सय्यद , पोलीस नाईक प्रवीण अहिरे , पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव , प्रवीण बागुल , विकास साळवे, सतीश आवारे,बाबासाहेब शेळके ,पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजणे, आदिनाथ पाखरे, नदीम शेख, गोवर्धन कदम, रोहित पालवे,गणेश लिपणे, अमोल भांड पोलीस नाईक मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर यांनी केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र पिंगळे हे करत आहेत.
राहुरी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात सशस्त्र आरोपी विरुद्ध केला गुन्हा दाखल, पैकी पाच आरोपी दरोड्यासाठी वापरलेल्या वाहन व हत्यारांसहअटकेत.

0Share
Leave a reply