इंदापूर प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : इंदापूर तालुक्यातील विठ्ठलवाडी पुणे सोलापूर रोडवर काळेवाडी नजीक धाकटे पंढरपूर या नावाने प्रसिद्ध असलेले विठ्ठल व रुक्माई चे सुंदर असे मंदिर आहे त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी दिवशी पंचक्रोशीतील विठ्ठल भक्त मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी दर्शनाला येतात , नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार प्रवीण (भैय्या) दशरथ माने पुणे जिल्हा बांधकाम सभापती यांच्या हस्ते झाला. या ठिकाणी मंदिर शिशोभीकरण, सभामंडप व लग्नकार्यासाठी मोठा हॉल या ठिकाणी गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींची लग्न मोठ्या प्रमाणात होतात असे येथील ट्रस्ट मंडळींनी सांगितले, दर महिन्याला एकादशीचा कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो. या ठिकाणी दर्शनाला गेल्या निसर्गरम्य ठिकाणी प्रसन्न असे वातावरण आहे. कळस मार्गे गेल्यास पूर्णपणे डांबरी रस्ता आहे.
Leave a reply