अ.नगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने खा. नीलेश लंके हे सहकाऱ्यांसह येत्या सोमवारपासून (२२ जुलै) येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.खा. लंके यांनी यासंदर्भात गुरूवारी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पत्र पाठविले आहे. या उपोषणासाठी लाउड स्पिकर तसेच मंडप लावण्यासंदर्भात परवानगी मागितली आहे. निवेदनात म्हटले आहे, स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत ११ जुलै रोजी पत्राव्दारे अवगत करण्यात आले होते. परंतु
त्याची अद्यापपर्यंत दखल घेतली गेली संबंधितांवर कुठलीही नाही, किंवा कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सहकाऱ्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार खा. लंके यांनी असल्याचे निवेदनात नमुद केले आहे. या तक्रारीसंदर्भात खा. लंके यांनी रोजी मुख्यमंत्र्यांना स्थानिक गुन्हे भ्रष्टाचाराकडे लक्ष गुन्हे शाखेचे ११ जुलै पत्र पाठवून शाखेतील वेधले होते. अधिकारी व कर्मचारी हे राजरोसपणे असल्याचा आरोप आला होता.
तसेच गुन्हे शाखा व सायबर हप्ते घेत करण्यात स्थानिक सेल या दोन्ही आस्थापना वेगवेगळ्या असून दोन्ही एकाच निरीक्षकांकडे कार्यभार देण्यात आल्याकडेही खा. लंके यांनी लक्ष वेधले होते. दरम्यान या तक्रारीची दखल घेतली न गेल्याने खा. लंके आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मागील वर्षी केलेल्या बदल्यांत प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जोपर्यंत उपोषण स्थगित होत नाही, तोपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या तात्पुरत्या स्थगित कराव्यात असेही खा. लंके यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. पोलीस
खा. निलेश लंके यांचे सोमवारपासून ‘स्थानिक गुन्हे शाखेच्या’ विरोधात उपोषण, पोलिसांच्या बदल्या तात्पुरत्या स्थगित ठेवण्याची मागणी

0Share
Leave a reply