पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : प्रगत विद्यालय वनकुटे या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयासाठी वृक्ष देऊन एक अनोखा पायंडा माजी विद्यार्थी यांनी घालून दिला त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधूंच्या वतीने त्यांचा योग्य सन्मान करण्यात आला याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी. रोहन मुसळे यांनी बोलतना आपल्या मित्रांना तुकाराम महाराजांचा अभंगाची आठवण करून दिली.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे मानवाशी असलेले नाते व वृक्षाचे महत्त्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग सांगितला आहे तो म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे । आळविती |यांच्या समावेत विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर वृक्षरोपण करण्यात आला.त्याप्रसंगी ओंकार औटी, तेजस खामकर, सौरभ डुकरे,अजय केदारी, शुभम पावडे,या माजी विद्यार्थ्यांच्या योगदाना बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वाघ एम. बी. यांनी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसमवेत त्यांचा योग्य असा सन्मान करण्यात आला.व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी विद्यालयांमध्ये वाचन दिन साजरा करण्यात आला. तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष श्री. सुजित राव झावरे पाटील व संस्थेचे सचिव श्री. सुदेश भैय्या झावरे पाटील यांनी या उपक्रमाबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या निसर्गाचा समतोल राखण्यास मदत केली. असेच उपक्रम राबवले जावेत जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल अशा प्रकारचे अपेक्षा या प्रसंगी केली गेली. वृक्षारोपण प्रसंगी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वच उपस्थित होते.
Leave a reply