जिल्हा प्रतिनिधी / इनायत अत्तार : पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका २८ वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. कोपरगाव शहरातील कर्मवीर नगर मधील शेती प्लॉट मध्ये ही घटना घडली. कोपरगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. शाहरुख हारून पटेल (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मच्छिन्द्र सोनवणे ऊर्फ मच्छू, स्वप्नील गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी, विकीचा मित्र नाव माहिती नाही, योगेश जाधव ऊर्फ पोंग्या (सर्व रा. कोपरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मृताच्या भावाने तक्रार दिली आहे.
मयत सोहेलचा भाऊ शाहरुख हारून पटेल (वय 25) याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपी मच्छिन्द्र सोनवणे उर्फ मच्छू यांच्या पत्नीचे व सोहेल हारून पटेल(वय 28) यांचे प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मच्छिन्द्र सोनवणे ऊर्फ मच्छू, स्वप्नील गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी, विकीचा मित्र नाव माहिती नाही, योगेश जाधव ऊर्फ पोंग्या यांनी मॅजिक (क्र. एम एच 15 ई 4795) मध्ये मारहाण केली. त्यांनतर तेथून मॅजिकमध्ये टाकुन कर्मवीर नगर मध्ये जावेद जमशेर शेख यांचे शेतीच्या प्लॉटमध्ये घेवून जावुन तेथे लाकडी दांडयाने, चाकुने, लोखंडी खिळे असलेल्या बांबूने मयत सोहेलच्या दोन्ही हातावर, डोक्यावर, दोन्ही पायावर, अंगावर, ठिकठिकाणी भोसकून दांडक्याने मारहाण करुन त्याला गंभीर जखमी करुन जिवे मारुन टाकले.
ही घटना घडताच मयताच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले. तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून तीन जण अद्याप फरार आहेत. फरार संशयितांना पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Leave a reply