नेवासा प्रतिनिधी / लखन वाल्हेकर : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नेवासा तालुक्यात आजी माजी लोकप्रतिनिधी व्यतिरिक्त तिसरा खंबीर ,सक्षम पर्याय म्हणून आम आदमी पार्टी, काँग्रेस, बहुजन मुक्ति पक्ष, व ईतर संघठणा मिळून लोकशक्ती आघाडीची स्थापना केली आहे, या आघाडीने तालुक्यात भेठीगाठीचा झंझावत सुरु करुन अनेक संघटना , पक्षाचे पदाधिकारी या आघाडीत सहभागी करुन घेण्याचा सपाटा चालविला आहे. अनेक पक्षाचे आजी माजी झेडपी,पंचायत समिती सदस्य यात सहभागी होत आहेत.
येणाऱ्या आठवडा भरात आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या लोकन्याय यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग वाढविण्यासाठी आघाडीचे पदाधिकारी जनजागृती अभियान राबवित असून अनेकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. आज बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष विकास चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी विकास चव्हाण यांनी लोकशक्ती आघाडीस आमचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे जाहीर करत आगामी विधानसभा निवडणुकीत लोकशक्ती आघाडीची महत्वाची भूमिका बजावनार असे स्पष्ट केले तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशक्ती आघाडी ही बाजी मारेल असे सूतोवाच केले तसेच लोकन्याय यात्रेत बहुजन समाज पार्टी सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आघाडीचे राजेन्द्र आघाव,संभाजी माळवदे, सुरेश शेटे,सादिक शिलेदार, संदीप अलवणे, गणपत मोरे, सुमित पटारे, राजु महानोर, आदीसह लोकशक्ती आघाडीचे कार्यकर्ते उपस्थीत होते.
बहुजन समाज पार्टी लोकशक्ती आघाडीत सहभागी, लोकन्याय यात्रेत सहभागी होणार – विकास चव्हाण

0Share
Leave a reply