Disha Shakti

सामाजिक

सौ.सीमा शितोळे (देशमुख) यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्तीदूत पुरस्कार जाहीर

Spread the love

दौंड प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : जिल्ह्यातील समर्थ सोशल फाउंडेशतर्फे व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती कार्यामध्ये सक्रिय असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. या वर्षी हा पुरस्कार दौंड तालुक्यातील राजेगाव येथील सौ सीमा रमेश शितोळे – देशमुख यांना जाहीर झाला आहे. त्यांना राज्यस्तरीय ‘व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या अगोदरही त्यांना महाराष्ट्र शासन बालकल्याण विभागाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून दौंड तालुका समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

राजेगावच्या माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत. गेली दहा वर्षापासून बचत गटाद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत व समाजकार्यात ही सक्रिय आहेत. अनेक वेळा त्यांनी दारूबंदीसाठी सुद्धा आंदोलने केली आहेत. त्यांच्या भिगवण येथील आधार व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून अनेक लोकांना व्यसनमुक्तीसाठी व मधुमेह मुक्तीसाठी लाभ झाला आहे .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!