Disha Shakti

इतर

जिल्ह्यातील सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : जिल्ह्यातील सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्याबाहेरून बदलून आलेल्या अधिकार्‍यांना नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत.

जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आलेले अधिकारी पुढीलप्रमाणे- सहायक पोलीस निरीक्षक जुबेर अहमद मुजावर (तोफखाना ते पारनेर), उपनिरीक्षक- रोहिदास ठोंबरे (कोपरगाव शहर ते श्रीरामपूर शहर), किरण साळुंखे (भिंगार कॅम्प ते राहाता), राजेंद्र चाटे (बेलवंडी ते नगर तालुका), अनंत सालगुडे (कर्जत ते स्थानिक गुन्हे शाखा), सचिन लिमकर (पाथर्डी ते श्रीगोंदे), संजय निकम (श्रीरामपूर तालुका ते भिंगार कॅम्प), शुभांगी मोरे (तोफखाना ते भिंगार कॅम्प), समीर अभंग (श्रीगोंदा ते संगमनेर), भूषण हंडोरे (अकोले ते कोपरगाव शहर), रणजीत मारक (नगर तालुका ते पारनेर)

याशिवाय जिल्ह्याबाहेरून दाखल झालेल्या पोलीस अधिकार्‍यांना नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले आहे.यात सहायक पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ (पारनेर), विकास काळे (कोतवाली), भारत बलैया (शिर्डी), कल्पना चव्हाण (नेवासा), संदीप हजारे (शिर्डी) उज्वलसिंह राजपूत (तोफखाना) धरमसिंह सुंदरडे (शेवगाव), किशोर पवार (कोपरगाव) हरीश भोये (पाथर्डी), गणेश अहिरे (श्रीगोंदे), संदीप परदेशी (राहुरी), अमोल पवार (राहुरी), युवराज आठरे (आर्थिक गुन्हे शाखा), सोमनाथ दिवटे (आर्थिक गुन्हे शाखा), उपनिरीक्षक- शैलेश शेजुळ (जामखेड), विकास जाधव (एमआयडीसी), विनोद खांडबहाले (अकोले), संदीप मुरकुटे (श्रीरामपूर तालुका), रोशन निकम (श्रीरामपूर शहर), प्रवीण महाले (शेवगाव) व महादेव गुट्टे (पाथर्डी) यांचा समावेश आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!