Disha Shakti

इतर

नायगाव तालुक्यात लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद, ऑनलाइन ८८४१ तर ऑफलाइन १००५० अर्ज प्राप्त – तहसीलदार डॉ.गायकवाड

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून शासन निर्णयानुसार आमदार राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित कऱण्यात आली असुन तालुकास्तरीय समितीत तहसीलदारांना सदस्य सचिव करून जबाबदारी दिली असल्यामुळे नायगाव तहसीलच्या तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड यांनी गावात जाऊन लाडकी बहीण योजनेची तात्काळ अंमलबजावणी व्हावी म्हणून गावागावात कॅम्प घेऊन महिलांना मार्गदर्शन करत आहेत,त्यामुळे नायगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नायगाव तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन फॉर्म भरून घेण्याचे काम त्या-त्या गावांतील अंगणवाडी सेविका यांच्याकडे सोपविण्यात आले असल्यामुळे एखाद्या महिलेने भरून दिलेल्या फॉर्ममध्ये कोणत्या तरी त्रुटीमुळे त्या महिलेला सदर योजनेचा लाभ मिळाला नाही तर ती लाभार्थी महिला आमच्या घरी येऊन वाद करेल अशा अनेक प्रकारच्या शंका निर्माण होत होत्या मात्र तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड यांनी गडगा, नावंदी, टेंभूर्णी , मांजरंम, रातोळी, कहाळा (खू.) कहाळा (बु.) आदी गावात कॅम्प लावून लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना सखोल असे मार्गदर्शन करून सर्वांचे अर्ज ऑनलाइन करून दिले आहे. त्यांना मांजरंम, रातोळी , कहाळा (खू.) कहाळा (बु.) आदी गावात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

नायगाव तालुक्यात दिनांक १ जुलै ते २४ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाइन प्राप्त अर्ज ७२१६ तर ऑफलाइन अर्ज ८९४१ प्राप्त झाले आहेत तर दिनांक २५ जुलै २०२४ रोजी ऑनलाइन अर्ज १६२५ प्राप्त झाले तर ऑफलाइन अर्ज ११०९ प्राप्त झाले असून आज पर्यंत म्हणजे १ जुलै पासून ते २५ जुलै २०२४ पर्यंत एकूण १८८९१ ऑनलाइन व ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड यांनी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!