भारत कवितके : परभणीचे ग्रामीण कवी लेखक गीतकार श्रीराम घडे यांची बालपण या कवितेची शालेय पाठ्यपुस्तकात नुकतीच निवड करण्यात आली आहे.बालपण या बाल कवितेत बालपण किती निरागस, टेन्शन फ्री असते यांचे वर्णन केले आहे.बालपणी अनुभव शब्दात मांडले आहेत.
बालपणी जात पात माहीत नसते.गरिबी श्रीमंती चे भय वाटत नाही.काम धंद्याचे टेन्शन नसते.पैसे, दागिने, पगार यांची काळजी वाटत नाही.बालपणीचा हसरा चेहरा पाहून वाटते माणुसकी फक्त बालपणातच आहे.बालपणीचा हसरा चेहरा पाहून वाटते बालपण सर्वात भारी.कोणाकडे पाहून गोड हसणे हे बालपणातच घडते.अशा आशयाची कविता श्रीराम घडे यांची बालपण ही कविता शालेय विद्यार्थ्यांना नक्कीच स्फुर्तीदायक वाटेल.यात शंकाच नाही.पुणे येथे राजयुवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या शब्द पंढरीचे आम्ही वारकरी या कवी संमेलनात ग्रामीण कवी लेखक गीतकार श्रीराम घडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.ग्रामीण कवी लेखक गीतकार श्रीराम घडे यांची बालपण ही कविता शालेय पाठ्यपुस्तका साठी निवड झाल्याने समाजाच्या विविध थरातून त्यांचेवर अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
Leave a reply