प्रतिनिधी / भारत कवितके : बारामती मध्ये रविवार दिनांक ११आगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता रयत भवन मंगल कार्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जागतिक पातळीवर जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बबनराव आटोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.या जयंती उत्सवात मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादन करण्यात येणार आहे.मान्यवरांचे सत्कार, मान्यवरांचे मार्गदर्शन, विशेष सत्कार, समाजातील समाज बांधवांनी व भगिनी यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुरुषांना समाज भूषण पुरस्कार व महिलांना अहिल्या रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती महोत्सवा साठी समिती चे अध्यक्ष बबनराव आटोळे, उपाध्यक्ष अँड.गुलाबराव गावडे, कार्याध्यक्ष गोविंदराव देवकाते, सरचिटणीस महेंद्र खटके, समन्वय अनिल आटोळे, संपर्क प्रमुख गजानन भगत,संघटक वीर धवल गाडे,व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांना या जयंती महोत्सवात समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.११आगस्ट २०२४ रोजी सकाळी ११वाजता धनगर समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती उत्सव साठी उपस्थित राहावे असे आवाहन समितीने केले आहे.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम
बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जागतिक पातळीवर जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन.

0Share
Leave a reply