Disha Shakti

Uncategorized

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची शहरातील कॅफेवर कारवाई 

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक २९/०७/२०२४ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, श्रीरामपुर शहरात अवैधरित्या कॅफे चालु असुन तेथे तरुण तरुणीला आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाते अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व सोबत पोसई मगरे, पोसई मेढे तसेच तपास पथकाचे पोना/कारखेले, पोकों/राहुल नरवडे, पोकों/गौतम लगड, पोको रमिजराजा आत्तार, पोकों/ अजित पटारे, पोकी/आंबादास आंधळे, पोकों/तारडे, पोको/चौधरी व चालक सफौ सुर्यवंशी यांनी शहरातील ५ कॅफेबर जावुन खात्री केली असता ” आपली कॅफे”, ” स्पार्कल कॅफे” व ” MH १७” असे ३ कॅफे मध्ये तरुण तरुणीला आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचे आढळले तसेच कॅफेमध्ये शाळा/कॉलेजमधील तरुण तरुणीही मिळुन आल्याने एकुण ३ कॅफे चालक यांच्यावर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला म.पो.का कलम ३३(W), ३३(X) (१) चे उल्लघंन म्हणुन कलम १२९,१३१ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर, श्री वैभव कलुबमें, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री बसवराज शिवपुजे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख, पोसई मगरे, पोसई मेढे तसेच तपास पथकाचे पोना/कारखेले, पोकों/राहुल नरवडे, पोकों/गौतम लगड, पोकों/रमिजराजा आत्तार, पोकों/अजित पटारे, पोकी/आंबादास आंधळे, पोकों/तारडे, पोकों/चौधरी व चालक सफौ सुर्यवंशी यांनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!