राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व तत्कालीन कर्मचाऱ्यांकडून जीविताला धोका असल्याबाबत व खोटे गुन्हे दाखल करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकारी व गृहमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. तसेच पोलीस संरक्षण देण्याची विजय मकासरे यांनी केली आहे. मकासरे यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की मी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांच्या विरोधात मालमत्तेची चौकशी करणे बाबत लाच लुचपत विभाग मुंबई तसेच लाचलुचपत विभाग अहमदनगर, नाशिक यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.या रागातून त्यांच्याकडून मला खोट्या गुन्ह्यात गोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच त्यांच्या काही कर्मचाऱ्यांकडून सुपारी देऊन माझ्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे. म्हणून मला पोलीस संरक्षण मिळावे व या अर्जाचा गांभीर्याने विचार करावा, ही नम्र विनंती व तसेच माझ्या जीविताला व कुटुंबीयांना काही बरे वाईट झाल्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगरचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांचे तत्कालीन कर्मचारी जबाबदार राहतील याची नोंद घेण्याची मागणी विजय मकासरे यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच या पत्राच्या प्रति गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग नाशिक, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनाही देण्यात आल्या आहेत.
एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व तत्कालीन कर्मचाऱ्यांकडून विजय मकासरे यांच्या जीविताला धोका ?, पोलीस महानिरीक्षकांकडे पोलीस संरक्षण देण्याची पत्राद्वारे मागणी

0Share
Leave a reply