Disha Shakti

इतर

श्रीरामपूर येथील आर टी ओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक कर्मचाऱ्याकडून शासनाची फसवणूक

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : सुलतान अय्युब पठाण सामाजिक कार्यकर्ते यांनी दिनांक 20 जून रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे वरिष्ठ लिपिक श्री दर्शन सोनावणे यांचे गैर कारभार व गैर वर्तुनुकी बाबत तक्रार अर्ज केले होते व त्या नंतर दिनांक 1 जुलै 2024 रोजी परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे तक्रार अर्ज दाखल केले होते त्या तक्रार अर्जा मध्ये वरिष्ठ लिपिक श्री दर्शन सोनवणे हे खासगी एजन्ट ला घेऊन हॉटेल गझल मध्ये बसून मध्यप्राशन करून सरकारी लॉग इन ओपन करून त्या खासगी एजन्टचे वाहनाचे हस्तांतरणचे कामे करत असतानाचे चित्रीकरण श्री सुलतान अय्युब पठाण यांनी काढले होते व ते पुरावे म्हणून दिनांक 29 जुन 2024 रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे सादर केले होते वारंवार तक्रार अर्ज आणि निवेदने देऊन सुद्धा वरील वरिष्ठ लिपिक दर्शन सोनावणे यांच्यावर कार्यवाही होत नाही त्या साठी श्री सुलतान अय्युब पठाण यांनी 14 ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यासाठीचे निवेदन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिनांक 02 ऑगस्ट रोजी  देण्यात आले आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!