Disha Shakti

सामाजिक

श्री.शिव हनुमान मंदिर बिलोली येथे वार्षिक वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन..

Spread the love

बिलोली प्रतिनीधी /साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली येथे देशमुख नगर, इंदिरानगर परिसरामध्ये भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री शिव हनुमान मंदिराचा दुसरा वार्षिक वर्धापन दिन व श्रावण मास निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३ व ४ ऑगस्ट रोजी पहाटे महाभिषेक व महाआरतीचे आयोजन तसेच दिनांक तीन व चार तारखेस 24 तास अखंड ओम नमः शिवाय नामाचा जप, 4 ऑगस्ट ला सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचे आयोजन व रात्री आठ वाजता भजन व हरिजागरचा कार्यक्रम होणार आहे.

सदरील धार्मिक कार्यक्रमांमध्ये बिलोली व परिसरातील भाविकांनी ईश्वरीय धार्मिक कार्यामध्ये आपण आपले अमूल्य योगदान देऊन आपल्या अध्यात्मिक परमार्थिक लाभ करून घ्यावा अशी विनंती श्रीशिव हनुमान मंदिर निर्माण समिती पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच समस्त भक्त वृंद बिलोलीच्या वतीने करण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!