पुणे प्रतिनिधी / भारत कवितके : शनिवार दिनांक १० आगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुणे येथे सकल धनगर समाजाच्या राज्य व्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.पुणे येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतीक भवन, गंज पेठ पुणे या ठिकाणी ” एकच नारा, धनगर सारा”,” लढा एसटी प्रमाण पत्र मिळेपर्यंत” ,” ना नेता,ना पक्ष आता एसटी आरक्षण हेच लक्ष” ,” देऊ आता एक नारा,करु धनगर एक सारा” ,” काम जुने च पण नव्या दमाने करायचे”, आदी गोष्टी वर विचार विनिमय करून पुढचे ठोस पाऊल उचलण्यासाठी सकल धनगर समाज राज्य व्यापी अधिवेशन भरविते आहे.
या राज्यव्यापी अधिवेशनात धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन धनगर समाजातील जेष्ठ पत्रकार कवी लेखक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केले आहे.धनगर समाजाने आजपर्यंत एसटी आरक्षण साठी खूप च संघर्ष केला आहे.अजूनपर्यंत यश मिळाले नाही, परंतु आता मात्र जुने काम (एसटी आरक्षणचे) नव्या दमाने करायचे, असे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांनी ठरविले आहे.
Leave a reply