बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : श्री.श्री.श्री १००८ केदारपीठ जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी च्या वतीने गोपाळचावडी नादेड येथे स्वर्गीय माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड साहेब यांना राजनिती व धर्म क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल सत्यशोधक संवर्धक ही मरणोत्तर पदवी देण्यात आली.
बिलोली देगलूर विधानसभेतील तळागळातील जनतेच्या मनात राज्य करणारे ठक्करवाड साहेब यांच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन श्री.श्री.श्री १००८ भीमाशंकर लिंग महास्वामीजी केदारपीठ जगद्गुरु यांच्या हस्ते ठक्करवाड साहेब यांचे चिरंजीव जि.प.सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड यांना पुरस्कार देण्यात आला.
सद्गुरूंनी आशीर्वाद दिला. तेव्हा उपस्थित चंद्रशेखर पाटील सावळीकर,धोंडू सावकार कोत्तावार, आबाराव संगनोड, सूर्यकांत महाजन, राजेंद्र रेड्डी तोटावाड,मारोती राहीरे, संजय भोसले, डॉ.रोहित ठक्करवाड, डॉ.संपदा ठक्करवाड, डॉ.मनोज पाटील, शंकर गंगुलवार,मोहनराव लंगडापुरे आदी पुरस्कार वितरणाचा वेळी उपस्थित होते
Leave a reply